Sankashti Chaturthi Today Horoscope 5 February 2026 In Marathi : आज ५ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर सुकर्मा योग जुळून येईल आणि फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. आज संकष्टी चतुर्थी आणि स्वामींचा वार गुरुवार असणार आहे. तर आजचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ५ फेब्रुवारी २०२६ (Sankashti Chaturthi Daily Horoscope 5 February 2026 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

कफविकार बळावू शकतात. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

तुमची इच्छाशक्ति वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)

मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)

आवडत्या गोष्टी कराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्व‍च्छंदीपणे वागाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर