Aajche Rashi Bhavishya 3 July 2026 In Marathi : आज ३ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील चतुर्थी तिथी सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनंतर सुरु होईल. सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत श्रावण नक्षत्र जुळून येईल आणि मग धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. त्याचबरोबर वाशी, आनंदादी, सुनफा, शंख, विष्कुंभ आणि सर्वार्थ सिद्धी असे अनेक शुभ योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. त्यामुळे हा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक मानला जात आहे. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. आज संकष्ट चतुर्थी असणार आहे, तिचे नाव कृष्णपिंगाला चतुर्थी असे आहे. त्याबरोबरच आज पंचक सुद्धा सुरु होत आहे. तर तुमच्यासाठी बाप्पा कोणती आनंदाची बातमी घेऊन येणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ३ जुलै २०२६ ( Horoscope Today 3 July 2026 In Marathi)

आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.

आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

उगाचच शब्दांचा अति वापर करू नका. संयम टिकवून ठेवावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

अघळ-पघळ बोलणे टाळावे. मुद्यांपासून दूर जाऊ नका. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. कामाचा ताण जाणवेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

नियम व अटींचे पालन करावे. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल. हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.

आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे.

आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

रहाणीमान सुधारण्यास वाव आहे. भागीदारीत चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभणे खुश व्हाल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका.

आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

हातातील कामांना गती येईल. कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल.

आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

नवीन प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल. मनातील शंका-कुशंका संपतील.

आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा.

आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

नवीन जोमाने कामे करा. कामाची थोडीफार धांदल राहील. भावंडांशी मतभेद वाढवू नका. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल.

आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात. काही अनपेक्षित जबाबदार्‍या येऊ शकतात.

आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर