Sankashti Chaturthi 2024 May: चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे, जो भक्तांचे सर्व विघ्न दूर करतो अडथळे दूर करतो. ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज चार शुभ योगांमध्ये साजरी होणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व संकटांपासून वाचण्यासाठी आणि श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास मोठ्या मनोकामनाही पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे.

एकदंत संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्र दिसण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे २६ मे रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी २६ मे रोजी संध्याकाळी ६.०६ वाजता सुरू होईल, जी २७ मे रोजी संध्याकाळी ४.५३ पर्यंत चालेल. त्यामुळे २६ मेच्या रात्री चंद्रदर्शन होणार आहे. २६ मे रोजी संकष्टी चतुर्थीला रात्री १०.४२ वाजता चंद्रदर्शन होईल.

हेही वाचा – “एक बार देख लीजिये…….हेल्मेट”, मुंबई पोलिसांनाही लागली ‘हीरामंडी’च्या डॉयलॉगची हवा! हटके स्टाईलमध्ये दिल्या खास टिप्स

एकदंत संकष्टी चतुर्थी 2024 पूजा मुहूर्त

ज्येष्ठ महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी पूजेसाठी २ शुभ मुहूर्त आहेत.२६ मे रोजी सकाळी ७:०८ ते दुपारी १२:१८ पर्यंत पहिला शुभ मुहूर्त आणि दुसरा शुभ मुहूर्त ७:१२ ते रात्री ९:४५ पर्यंत आहे. संकष्टी चतुर्थीची पूजा रात्री चंद्र देवाला अर्घ्य दिल्यावरच पूर्ण मानली जाते. यानंतरच उपवास सोडावा.

एकदंत संकष्टी चतुर्थीला ४ शुभ योग

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे संकष्टी चतुर्थी या दिवशी साध्य योग, भद्र योग आणि शिव वास योग असे अतिशय शुभ योग आहेत. या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळेल. तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील.

हेही वाचा – “भावा जिमचे पैसे दे”; जिममध्ये आलेल्या तरुणाचा माकडाने केला पाठलाग, Viral Video पाहून हसालपोट धरून

संकष्टी चतुर्थीला या राशींचे भाग्य उजळेल

रविवार, २६ मे २०२४ रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीला तयार होत असलेला शुभ योग ५ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे. हा शुभ योग मेष, वृषभ, मिथुन, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल. श्रीगणेशाच्या कृपेने या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल. त्यांना आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायात वाढ होईल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण त्या चांगल्या प्रकारे हाताळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला हवा तसाजीवनसाथी मिळेल.