Dainik Rashi Bhavishya 31 August 2026 In Marathi : आज ३१ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील आणि मग चतुर्थी तिथी सुरु होईल. आज रेवती नक्षत्र जागृत होईल आणि गंड योग जुळून येणार आहे. राहू काळ ७ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आज तिसरा श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थी देखील असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार याबद्दल जाणून घेऊया.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३१ ऑगस्ट २०२६ (Rashi Bhavishya 31 August 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जुगारातून धनलाभ संभवतो. अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर