Rashi Bhavishya 2 August 2026 In Marathi : आज २ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील चतुर्थी तिथी असणार आहे. आज पूर्वाभाद्रपद नक्षत्र जागृत असेल आणि अतिगंड योग जुळून येईल. राहू काळ ५ वाजून २७ मिनिटांनी सुरु होईल ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, १ ऑगस्ट २०२६ (Daily Horoscope 1 August 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरत जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर