Sankashti chaturthi september 2023: भगवान श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. अनेक अडचणी, संकटांपासून दूर राहण्यासाठी शक्ती देणाऱ्या या देवताची प्रत्येक शुभ कार्यात प्रथम पूजा करण्याची एक परंपरा आहे. श्रावण महिन्यात आपल्या सर्वांच्या या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होईल. तत्पूर्वी आज श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते.

संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्टीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते आणि त्याची सर्व दु:खे दूर होत, संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. या संकष्टी चतुर्थीनिमित्त तुमच्या शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ कोणती आहे जाणून घेऊ…

21st July Panchang & Rashi Bhavishya
२१ जुलै पंचांग: गुरुपौर्णिमेला साईबाबा कोणत्या राशीला देतील आशीर्वाद? शुभ दिनी १२ राशींपैकी कुणाचं नशीब उजळणार?
15th July Rashi Bhavishya & Panchang
१५ जुलै पंचांग: देवशयनी एकादशीआधीचा शेवटचा सोमवार १२ पैकी ‘या’ राशींना देणार लाभ, वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य
August Lucky Zodiac
August Lucky Zodiac : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार! मंगळ गोचरमुळे मिळेल छप्परफाड पैसा
14th July Rashi Bhavishya & Panchang
१४ जुलै पंचांग: रविवारी दुर्गाष्टमीला सिद्ध योगामुळे १२ राशींचे नशीब कसे चमकणार? पावसासह कुणावर बरसणार लक्ष्मीची कृपा?
Rain Predictions In Maharashtra As Per Astrology
Rain Predictions: जुलै महिन्यात ‘या’ तारखांना वेडावाकडा पाऊस बरसणार; नक्षत्रानुसार ३१ जुलैपर्यंत ‘असं’ असेल हवामान
9th July Panchang & Rashi Bhavishya
९ जुलै पंचांग: आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी अन् सिद्धी योग जागृत; आज १२ पैकी ‘या’ राशींचा दिवस जाईल मोदकापेक्षा गोड
6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा
5th July Panchang & Marathi Horoscope
५ जुलै पंचांग: आर्द्रा नक्षत्रात आज सुखाच्या सरी बरसणार? ‘या’ राशींचा दिवस आनंदाने होईल सुरु, अमावस्या विशेष राशी भविष्य वाचा

तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ

१) मुंबई – रात्री ९ वाजून २५ मिनिटे

२) डोंबिवली – रात्री ९ वाजून २४ मिनिटे

३) कल्याण – रात्री ९ वाजून २४ मिनिटे

४) ठाणे – रात्री ९ वाजून १४ मिनिटे

५) कोल्हापूर – रात्री ९ वाजून २१ मिनिटे

६)जळगाव – रात्री ९ वाजून १२ मिनिटे

७) नाशिक – रात्री ९ वाजून २० मिनिटे

८) पंढरपूर- रात्री ९ वाजून १६ मिनिटे

९) रत्नागिरी – रात्री ९ वाजून २५ मिनिटे

१०) सावंतवाडी – रात्री ९ वाजून १४ मिनिटे

११) सातारा – रात्री ९ वाजून २१ मिनिटे

१२) सोलापूर – रात्री ९ वाजून १४ मिनिटे

१३) औरंगाबाद – रात्री ९ वाजून १४ मिनिट

१४) अलिबाग – रात्री ९ वाजून २५ मिनिटे

१५) बीड – रात्री ९ वाजून १३ मिनिटे

१६) चंद्रपूर – रात्री ८ वाजून ५७ मिनिटे

१७) यवतमाळ – रात्री ९ वाजून ०२ मिनिटे

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)