Dwi Dwadash Rajyog 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. एका ठरावीक काळानंतर नऊ ग्रह राशी परिवर्तन करतात. त्यांच्या गोचर भ्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतात. नऊ ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व असतं. हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचं मोठं संक्रमण मार्च महिन्यात झालं आहे. २९ मार्चला तब्बल अडीच वर्षांनंतर शनीनं मीन राशीत प्रवेश केला आहे. सध्या शनि मीन राशीत स्थित असून ७ जून रोजी सकाळी ६:५९ वाजता तो शनी मित्रग्रह शुक्राबरोबर ३० अंशांवर येणार आहे, ज्यामुळे एक विशेष ‘द्विद्वादश योग’ तयार होणार आहे. शुक्र आणि शनि द्विद्वादश योग बनवत आहेत. या योगामुळे काही राशींना आर्थिक, सामाजिक व करिअरच्या क्षेत्रात जबरदस्त लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली…
द्विद्वादश योगाच्या निर्मितीमुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
वृषभ राशी (Taurus)
वृषभ राशीसाठी शनि-शुक्राचा द्विद्वादश योग सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकतो. दीर्घकालीन योजना यशस्वी होऊ शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊन यशाचे नवीन मार्ग सापडू शकतात. व्यापाराच्या क्षेत्रात आखलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनिचा द्विद्वादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नव्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल, कौशल्यात वाढ होईल, धार्मिक प्रवासाचे योग निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. समाजात प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये उल्लेखनीय प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो.
मकर राशी (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनिचा द्विद्वादश योग लाभदायी ठरु शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतो. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात नवीन प्रकल्प मिळू शकतात. शेअर बाजार किंवा लॉटरीमधून नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग तयार होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)