Shani Margi 2026 Positive Impact on These Zodiac Signs: दिवाळीनंतर ग्रहांच्या हालचालींमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार ११ डिसेंबर रोजी शनी मार्गी होणार असून, त्यानंतर शनीची मार्गी चाल सुरू होईल. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म, शिस्त, मेहनत, जबाबदारी आणि विलंबानंतर मिळणाऱ्या परिणामांचा कारक मानले जाते. त्यामुळे शनीची चाल बदलली की, त्याचा प्रभाव विविध राशींच्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो.
ग्रह ‘मार्गी’ म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रात एखादा ग्रह मार्गी होणे म्हणजे तो वक्री अवस्थेतून बाहेर येऊन पुन्हा सरळ गतीने भ्रमण करू लागणे. शनीची ही स्थिती काही राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत अनुकूल ठरू शकते, अशी ज्योतिषशास्त्रीय शक्यता व्यक्त केली जाते. ११ डिसेंबरनंतर शनी पुढील वर्षी ९ ऑगस्टपर्यंत मार्गी अवस्थेत राहणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा कालावधी काही राशींच्या व्यक्तींसाठी विशेष ठरू शकतो.
वृषभ
शनीची मार्गी चाल सुरू झाल्यानंतर करिअरमध्ये काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून एखाद्या संधीची वाट पाहत असाल, तर ती पुढे येऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याची किंवा सध्याच्या कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जाते. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू लागल्याने आत्मविश्वासही वाढू शकतो.
आर्थिक बाबतीतही परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते; तर अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळू शकते. एखादा रखडलेला आर्थिक व्यवहार पूर्ण होऊन धनलाभाचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. कामातील सातत्य आणि योग्य निर्णय यांमुळे मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मिथुन
दीर्घकाळ केलेल्या मेहनतीनंतर त्याचे परिणाम दिसू लागण्याचा हा काळ ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन आणि चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या नोकरीत कामगिरीची दखल घेतली जाऊ शकते. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने करिअरला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकांसाठीही अडकलेले व्यवहार पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळू शकतात. पूर्वी रखडलेले व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता असून, नियोजनपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते आणि पद, प्रतिष्ठा किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी मिळाल्याने स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतात. त्यातून नवीन काम, ग्राहक किंवा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून रखडलेले काम मार्गी लागल्याने मानसिक ताणही कमी होऊ शकतो. धनलाभासोबतच सामाजिक मान-सन्मान वाढण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषशास्त्रीय संकेत सांगतात.
मकर
शनी हा मकर राशीशी संबंधित महत्त्वाचा ग्रह मानला जात असल्याने त्याची मार्गी अवस्था विशेष लक्षवेधी ठरू शकते. करिअरमध्ये नवीन दिशा, प्रमोशन किंवा अधिक जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे परिणाम हळूहळू समोर येऊ शकतात. अपूर्ण कामे पूर्ण होऊन पुढील संधींसाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
व्यवसायातही परिस्थिती अनुकूल होऊ शकते. योग्य नियोजन केल्यास नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. पैशांची आवक वाढण्यासोबतच पैतृक संपत्तीशी संबंधित एखादा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. अनुभव, संयम आणि सातत्य यांच्या जोरावर या काळात महत्त्वाची प्रगती साधता येऊ शकते.
एकूणच, ११ डिसेंबरनंतर शनीची मार्गी चाल या चार राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक, करिअर आणि व्यावसायिक बाबतीत काही सकारात्मक शक्यता निर्माण करू शकते. मात्र, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे या अंदाजांकडे केवळ ज्योतिषशास्त्रीय शक्यता म्हणून पाहणे योग्य ठरेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
