Shani Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनि ग्रह सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह असून शनिचे राशी परिवर्तन अडीच वर्षांतून एकदा होते. परंतु, शनिचे नक्षत्र परिवर्तन राशी परिवर्तनाच्या तुलनेत लवकर होत असते. शनिच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा शुभ किंवा अशुभ परिणाम नेहमीच १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. पुढील काही तासांत शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून येणारा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक सिद्ध होईल.

शनि चमकवणार तुमचे भाग्य

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनिचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात आनंदी असाल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींनाही शनिचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. परदेशात जाण्याची इच्छा असल्यास तुमचे स्वप्न पूर्ण होईल, धार्मिक कार्यात मन रमेल.

हेही वाचा: राहू-केतू करणार मालामाल; पुढचे ९ महिने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल बक्कळ पैसा

कुंभ

शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा कुंभ राशीच्या व्यक्तींनाही होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात लोक तुमचा मानसन्मान राखतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)