Shani Margi November 2025: २८ नोव्हेंबरपासून शनीदेव मीन राशीत मार्गी होणार आहेत. शनी मार्गी होणं हे काही राशींसाठी आशादायक परिणाम देणारं ठरू शकतं, पण ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या मार्गी गतीचा परिणाम थेट आर्थिक स्थैर्य, करिअर आणि आरोग्यावर पडू शकतो. चला तर मग पाहूया कोणत्या राशींनी या काळात अधिक सतर्क राहायला हवं आणि शनीच्या या संक्रमणाचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो.

मेष – परीक्षा आणि चाचणीचा काळ सुरू!

सध्या मेष राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या प्रभावात आहेत. २८ नोव्हेंबरला शनी मार्गी होताच, या राशीतील लोकांसाठी एक नवा परीक्षा काळ सुरू होऊ शकतो. ज्योतिषदृष्ट्या पाहिलं तर या काळात केलेल्या चुकीच्या कृतींचा परिणाम परत मिळू शकतो. कामकाजाच्या ठिकाणी अचानक अडथळे, वरिष्ठांशी मतभेद किंवा कामात विलंब अशा समस्या उद्भवू शकतात. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट प्लॅनिंग अतिशय गरजेचं ठरेल. काही लोकांना नोकरीत अस्थिरता जाणवू शकते, तर काहींना मानसिक दडपण येऊ शकतं.

सिंह – आरोग्य आणि कौटुंबिक तणाव वाढू शकतो!

ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ सिंह राशींच्या लोकांसाठी आरोग्य आणि घरगुती आयुष्यासाठी थोडासा संवेदनशील ठरू शकतो. या काळात किरकोळ आजार दुर्लक्षित केल्यास ते मोठं रूप घेऊ शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष टाळा. शरीरात थकवा, मानसिक तणाव किंवा झोपेचा अभाव यामुळे चिडचिड वाढू शकते. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा येऊ शकते, पण फोकस न हरवणं हाच खरा उपाय आहे.

मीन – स्वतःच्या राशीत शनी मार्गी; जबाबदारी वाढणार!

मीन राशीतच शनी मार्गी होणार आहेत त्यामुळे या राशीसाठी हा काळ सर्वात निर्णायक आणि आव्हानात्मक ठरू शकतो. २८ नोव्हेंबरनंतर करिअर क्षेत्रात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर काहींना नोकरीत बदल किंवा ताण सहन करावा लागू शकतो. पूर्वी केलेल्या कामातील एखादी चूक आता समोर येऊ शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. आर्थिक क्षेत्रात उधारी, कर्ज किंवा व्यवहारांमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. काहींना कर्जदात्यांकडून दबाव येऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. या काळात चुकीच्या सवयींना किंवा वाईट संगतीला दूर ठेवलं नाही तर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

२८ नोव्हेंबरपासून शनी मार्गी होणं म्हणजे नशिबाच्या चक्रात हळूहळू बदल सुरू होणं. काही राशींसाठी हा काळ प्रगतीचा मार्ग दाखवेल, पण मेष, सिंह आणि मीन राशींनी या काळात आर्थिक नियोजन, आरोग्याची काळजी आणि कामातील जबाबदारी याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. ज्योतिषशास्त्र सांगतं शनीचा काळ कठीण असतो, पण तो शिक्षा नव्हे तर शिस्त शिकवतो! योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास ठेवल्यास हा काळही तुमच्या बाजूने फिरू शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)