Shani Vakri 2026 : जेव्हा जेव्हा शनी राशी किंवा नक्षत्रबदल करतो तेव्हा तेव्हा त्याचा सर्व राशींच्या लोकांवर काही ना काही परिणाम होतो. मग हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. त्यात शनी लवकरच वक्री होत मीन राशीत प्रवेश करेल. त्याने तीन राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेमुळे तीन राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. शनी वक्री होताच कोणत्या राशींच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल ते जाणून घेऊ…

१३८ दिवस शनी वक्री अवस्थेत

शनी २७ जुलै ते ११ डिसेंबरपर्यंत वक्री अवस्थेत राहील. शनीच्या वक्री गतीचा हा १३८ दिवसांचा कालावधी तीन राशींच्या लोकांसाठी सर्वांत फायदेशीर ठरेल.

तूळ

शनीची वक्री अवस्थेमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमधील आव्हानांपासून दिलासा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आरोग्याच्या समस्यांपासूनही तुमची सुटका होईल. तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी आनंददायी असेल. नोकरी, व्यवसायातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक

शनीची वक्री गती या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. तुमचे उत्पन्न वाढेल. नातेसंबंध अधिक गोड होतील. तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. परदेशात नोकरी मिळविण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

कुंभ

शनीची वक्री गती कुंभ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बॉस तुमच्या कामावर खूश असतील. त्यामुळे तुम्हाला चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घर किंवा वाहनाची खरेदी करू शकता. तुम्ही फिरायलाही जाऊ शकता.

(टीप- वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही. )