Shani Negative Impact: २० ऑगस्टला शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनी ९ ऑक्टोबरपर्यंत रेवती नक्षत्रात राहतील. विशेष म्हणजे, हे नक्षत्र परिवर्तन सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दरम्यान होत आहे. १२ ऑगस्टला सूर्यग्रहण, तर २८ ऑगस्टला चंद्रग्रहण लागणार आहे. रेवती नक्षत्राचा संबंध बुध ग्रहाशी मानला जातो.
ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म आणि न्यायाचा ग्रह मानले जाते. ज्योतिषांच्या मते, शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा सर्वाधिक परिणाम मेष, कर्क आणि वृश्चिक राशींवर होईल. या तीन राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी करिअर आणि आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण करू शकतो.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये. या काळात कोणतेही मोठे धोके पत्करू नका. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. विचार न करता घेतलेला निर्णय अडचणी वाढवू शकतो. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या गोष्टींचे वादात रूपांतर होऊ देऊ नका. आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांचा मानसिक ताण वाढू शकतो. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. नवीन काम सुरू करण्यापूर्वी पूर्ण तयारी करा. नियोजन करून केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जास्त राहील. नातेसंबंधांमध्ये मतभेद असतील तर शांतपणे चर्चा करा. संवादातून गैरसमज दूर होऊ शकतात. प्रवास करताना काळजी घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बचत आणि खर्च यामध्ये योग्य समतोल राखा. पैशांशी संबंधित प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. या काळात पैशांचे व्यवहार शक्यतो टाळा. पैशांच्या कारणामुळे इतरांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामाचे फळ मिळण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे संयम ठेवा. विनाकारण वाद घालणे टाळा. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
