Saturn Transit In Aquarius: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. नवग्रहात शनी अत्यंत मंद गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एकाच राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे २०२३ मध्ये अनेक वर्षांनंतर शनीने त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये प्रवेश केला; जो २०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश करील. सध्या शनी कुंभ राशीत वक्री झाला असून, त्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता, असे म्हटले जाते. जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. शनीच्या कुंभ राशीतील उपस्थितीमुळे शश राजयोग निर्माण झाला असून, हा राजयोग २०२५ पर्यंत राहील. तसेच शनीच्या कुंभ राशीतील येणाऱ्या २३० दिवसांचा काळ काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देणारा ठरेल. शनीची चाल करणार मालामाल (Saturn Transit In Aquarius) मेष शनीच्या चालीमुळे येणारे २३० दिवस मेष राशीधारकांसाठी लाभदायी ठरतील. या काळात तुमच्या अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. सिंह आगामी २३० दिवस सिंह राशीधारकांना अत्यंत अनुकूल परिणाम देणारे ठरतील. या काळात आर्थिक लाभ होतील. व्यवसायिकांना यश मिळेल. करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. पुढील २३० दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. हेही वाचा: १० दिवसांनंतर पैसाच पैसा; गुरूचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना देणार ज्ञान, सुख आणि संपत्तीचे सुख तूळ शनी येणारे २३० दिवस कुंभ राशीत विराजमान राहून तूळ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देईल. या काळात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबीयांसह फिरायला जायचा प्लान कराल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. या काळात तुमची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)