Shani Vakri June 2024: कलियुगातील कर्म व न्याय देवता शनी हे ठराविक वेळेनंतर राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनी एका राशीत दुसऱ्यांदा येण्यासाठी एक दोन नव्हे तर ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनी २०२३ च्या जानेवारीपासून स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभेत स्थित आहे. या राशीत येत्या मार्च २०२५ पर्यंत शनी कायम असणार आहे. शनीचे वास्तव्य कुंभेतच असणार असले तरी त्याची स्थिती व चाल वारंवार बदलत असते. आता जून महिण्यात सुद्धा ३० तारखेला शनी आपली वक्री चाल सुरु करणार आहे. २९ जूनपासून शनी या स्थितीत येण्यासाठी सज्ज होतील व ३० जूनचा दिवस सुरु होताच रात्रीच १२ वाजून ३५ मिनिटांनी कुंभ राशीत शनी वक्री होतील. या अवस्थेत शनी महाराज १५ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेचा लाभ काही राशींना होणार आहे तर काहींना खूप सावध राहावे लागणार आहे. पुढील १३९ दिवस कोणत्या राशी नशिबाने धनवान होतील हे पाहूया..

कर्क रास (Caner Rashi Bhavishya)

कर्क राशीच्या गोचर कुंडलीत शनी हा आठव्या स्थानी वक्री भावात असणार आहे. या राशीच्या सातव्या व आठव्या स्थानचे स्वामित्व शनीकडे आहे त्यामुळे येत्या काळात कर्क राशीच्या मंडळींना शनीच्या वक्री होण्याने फायदा होऊ शकतो. या राशीला अप्रत्यक्ष रूपात धन लाभ होऊ शकतो. अडकून पडलेले काम पूर्ण झाल्याने आयुष्यातून हरवलेली गती पुन्हा प्राप्त होईल. धन- धान्याची घरी दारी वृद्धी होईल. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. नोकरीच्या काही नवीन संधी तुमच्यापर्यंत येतील पण काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला तुमच्या सध्या करत असलेल्या कामातूनच लाभ संभब्यो. व्यवसायात गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगावी.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

या राशीच्या मंडळींसाठी शनीचे वक्री होणे लाभदायक सिद्ध होऊ शकते. प्रदीर्घ काळापासून अडकून पडलेले काम फार कष्ट न देता अचानक व अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकते. या कालावधीत आपल्याला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. आपले मन प्रसन्न राहील त्यामुळे आयुष्यात आली मरगळ व कंटाळा दूर होईल. कुटुंबासह एखादी लहानशी ट्रिप करूशकता . तुम्ही इतक्या वर्षात पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकते. वेतनात वाढ होण्याचे संकेत आहेत. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. थोडक्यात तुम्हाला यावेळी मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळण्याची चिन्हे आहेत. तणावमुक्त झाल्याने तुमचे आरोग्य सुद्धा सुधारणार आहे.

हे ही वाचा<< १४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

या राशीच्या गोचर कुंडलीत शनी दुसऱ्याच भावी वक्री होऊन भ्रमण करणार आहे. मुळात तुमच्या राशीचे स्वामित्व शनीकडे असल्याने शनीची उलट चाल सुद्धा आपल्याला लाभदायक सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्याला खूप नफा कमावता येईल. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. नोकरदार मंडळींना येत्या काळात नोकरीत बदलांचे संकेत आहेत. आपल्या कामाची चिकाटी आपल्याला प्रचंड प्रशंसा मिळवून देऊ शकते. व्यवसायात मरंगातील अडथळे दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रवासाचे योग्य आहेत. काही लाभ आपल्याला लगेचच मिळणार नाहीत पण तुम्ही या कालावधीत केलेली सुरुवात भविष्यात मोठा परतावा मिळवून देऊ शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारीत आहे)