September Horoscope Uranus Retrograde: सौरमालेतील नवग्रहांमध्ये अरुण ग्रहाचा समावेश केला जात नाही. मात्र, ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाला विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला इंग्रजीत युरेनस (Uranus) असे म्हणतात. हा ग्रह एका राशीत सुमारे ७ ते ८ वर्षे राहतो. त्यामुळे संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला जवळपास ८४ वर्षे लागतात. अशा परिस्थितीत अरुण ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर काही ना काही स्वरूपात दिसून येतो.
सध्या अरुण ग्रह वृषभ राशीत आहे. १० सप्टेंबर २०२६ रोजी तो याच राशीत वक्री होणार आहे. अरुण ग्रहाच्या या वक्री अवस्थेमुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. धन, वैभव आणि प्रेमाचा कारक असलेल्या शुक्राच्या वृषभ राशीत युरेनसची उलटी चाल काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडवू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आले आहे. जाणून घेऊया, अरुण ग्रह वक्री झाल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.
द्रिक पंचांगानुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी युरेनस वृषभ राशीत वक्री होत आहे. तो ८ फेब्रुवारी २०२७ रोजी सायंकाळी ५:५७ वाजता पुन्हा मार्गी होईल. विशेष म्हणजे, अरुण ग्रहाने १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:५४ वाजता वृषभ राशीत प्रवेश केला होता. तो ६ जुलै २०३१ रोजी दुपारी १२:२१ वाजेपर्यंत याच राशीत राहणार असून त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
मेष राशीवर अरुण ग्रहाच्या वक्री होण्याचा प्रभाव (Aries Zodiac)
मेष राशीच्या व्यक्तींना अरुण ग्रहाच्या वक्री होण्यामुळे अनेक क्षेत्रांत चांगले परिणाम मिळू शकतात. तुमची बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती अधिक वाढू शकते. उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. संशोधन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष फायदा होऊ शकतो. तसेच, आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. मात्र, कोणताही मोठा धोका पत्करणे टाळावे.
कन्या राशीवर अरुण ग्रहाच्या वक्री होण्याचा प्रभाव (Virgo Zodiac)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अरुण ग्रहाचे वक्री होणे शुभ ठरू शकते. या राशीच्या नवव्या भावात अरुण ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे अध्यात्माकडे अधिक ओढ निर्माण होऊ शकते. मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आणि अडचणी हळूहळू दूर होतील. मात्र, कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नये. धार्मिक कार्यांमध्ये तुमचा सहभाग वाढेल. लांबच्या प्रवासाचा योग असून त्यातून लाभ मिळू शकतो. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, परदेशाशी संबंधित रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंह राशीवर अरुण ग्रहाच्या वक्री होण्याचा प्रभाव (Leo Zodiac)
सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडू शकतात. करिअरमध्ये मोठा बदल किंवा नवे वळण मिळू शकते. मोठी जबाबदारी किंवा उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधीही मिळू शकतात. या राशीच्या दहाव्या भावात अरुण ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायातही चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः पारंपरिक व्यवसायाऐवजी तंत्रज्ञान, संशोधन, मीडिया, विज्ञान किंवा कला अशा क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. समाजात तुमची प्रतिमा अधिक चांगली होईल. मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
