September Horoscope: १८ सप्टेंबर २०२६ रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासूनच गुरु ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे कर्क राशीत मंगळ आणि गुरु यांची युती होणार आहे. ज्योतिषांच्या मते, या मंगळ-गुरु युतीमुळे या ४ राशींच्या लोकांना धन-धान्याची प्राप्ती होईल. तसेच प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

मेष रास (Aries Horoscope)

मंगळ-गुरुची युती मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तसेच जमीन-जुमल्याशी संबंधित कामांमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि गुरुची युती शुभ ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही मंगळ-गुरुची युती फायदेशीर ठरणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना यश मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मंगळ-गुरुच्या युतीमुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे प्रबळ योग आहेत. तसेच गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)