Mangal Guru Yuti: १८ सप्टेंबरला मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासूनच गुरु ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे येथे मंगळ आणि गुरु यांची युती होणार आहे. कर्क राशीत गुरु उच्च राशीत तर मंगळ नीच राशीत मानला जातो. ज्योतिषशास्त्रात मंगळाचा संबंध ऊर्जा, धाडस, जमीन-जुमला आणि मेहनतीशी जोडला जातो. तर गुरु हा ज्ञान, धन, प्रगती आणि भाग्याचा कारक मानला जातो. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, या युतीचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. मात्र, चार राशींना या युतीचा सर्वाधिक शुभ लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरु युती करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगले परिणाम देऊ शकते. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि त्यांच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा प्रकल्प किंवा फायदेशीर व्यवहार मिळू शकतो. मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क रास
मंगळ आणि गुरु यांची युती कर्क राशीतच होत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा योग खास ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची नवीन दारे उघडू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विवाहित लोकांच्या वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल आणि मनातले अनेक काम पूर्ण होऊ शकतात.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मंगळाचे कर्क राशीत होणारे गोचर या राशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मंगळ-गुरु युतीमुळे नशिबाची साथ मिळू शकते. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळू शकतात. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते.
मीन रास
मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे कर्क राशीत गुरु आणि मंगळाची युती या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याबरोबरच उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि मोठ्या व्यवहारांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि जवळीक वाढण्याचे संकेत आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
