Marathi Calendar September 2026 : हिंदू धर्मात भाद्रपद महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक प्रमुख उपवास व सण येतात. सप्टेंबर महिन्याची सुरुवात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीने होणार असून, या महिन्याचा शेवट भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीने होईल. श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या या महिन्यात कृष्ण जन्माष्टमीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंतचे अनेक मुख्य सण साजरे केले जाणार आहेत. त्याशिवाय ऋषी पंचमी, एकादशी, अंगारकी संकष्टी चतुर्थी यांसारखे उपवासही भाद्रपद महिन्यात असणार आहेत. या महिन्यात होणारे ग्रह-नक्षत्रांचे बदल १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. चला तर मग, भाद्रपद महिन्यातील प्रमुख सण आणि त्यांच्या तारखांबद्दल जाणून घेऊया.
भाद्रपद २०२६ महिना कधी सुरू होईल?
श्रावण महिना ११ सप्टेंबर २०२६ रोजी अमावास्येला संपेल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ सप्टेंबर २०२६ रोजी, भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल.
सप्टेंबर मधील सण-उत्सवांची यादी
१ सप्टेंबर – मंगळागौरी पूजन
४ सप्टेंबर – श्री कृष्ण जयंती
५ सप्टेंबर – गोपाळकाला , शिक्षक दिन
७ सप्टेंबर – चौथा श्रावणी सोमवार आणि अजा एखादाशी
८ सप्टेंबर – भोमप्रदोष
१० सप्टेंबर – पोळा
११ सप्टेंबर – श्रावण अमावस्या
१२ सप्टेंबर – भाद्रपद मासारंभ
१४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
१५ सप्टेंबर – ऋषी पंचमी
१७ सप्टेंबर – ज्येष्ठ गौरी आवाहन
१८ सप्टेंबर – ज्येष्ठ गौरी पूजन
१९ सप्टेंबर – ज्येष्ठ गौरी विसर्जन
२२ सप्टेंबर – परिवर्तिनी एकादशी
२५ सप्टेंबर – अनंत चतुर्दशी
२७ सप्टेंबर – पितृ पक्ष
२९ सप्टेंबर – अंगारक संकष्टी चतुर्थी
या वर्षीची कृष्ण जन्माष्टमी ठरणार खास?
कृष्ण जन्माष्टमी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष मानली जात आहे. यंदा ४ सप्टेंबर २०२६ रोजी कृष्ण जन्माष्टमीला साजरी केली जाईल. या दिवशी अनेक प्रमुख ग्रह अनुकूल स्थितीत असतील. चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभ, गुरू त्याच्या उच्च राशी कर्क, तर सूर्य त्याच्या स्वराशी सिंह आणि शुक्र स्वराशी तूळमध्ये असणार आहे. त्याचबरोबर मंगळ व शुक्र यांच्यात नवपंचम योगदेखील तयार होत आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ही ग्रहस्थिती काही लोकांसाठी करिअरमधील प्रगती, उत्पन्न आणि आर्थिक संधी दर्शवू शकते.
