September Rajyog 2026: सप्टेंबर महिना सुरू होणार असून ग्रहांच्या दुर्मिळ स्थितीमुळे एकाच वेळी ३ मोठे राजयोग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशिपरिवर्तन आणि एकमेकांशी होणारा संयोग अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा एकाच राशीत किंवा नक्षत्रात एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात, तेव्हा विशेष योग बनतात. सप्टेंबर २०२६ मध्ये ग्रहांच्या या बदलांमुळे भद्र, लक्ष्मी नारायण आणि मालव्य हे ३ अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहेत. यामुळे ४ राशींच्या लोकांच्या आयुष्यात प्रगती, मान-सन्मान आणि भरपूर धनलाभाची शक्यता आहे.

तीन प्रमुख राजयोग आणि त्यांचे महत्त्व

भद्र राजयोग (७ सप्टेंबर २०२६): ग्रहांचा राजकुमार ‘बुध’ कन्या प्रवेश करेल. यामुळे भद्र राजयोग बनेल, ज्यामुळे बुद्धिमत्ता, व्यापार, बँकिंग क्षेत्र आणि निर्णयक्षमतेत सुधारणा होईल.

लक्ष्मी नारायण राजयोग (७ सप्टेंबर २०२६): कन्या किंवा तूळ राशीत शुक्र आणि बुध ग्रहांची युती झाल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. हा योग आर्थिक समृद्धी, पैशांची आवक आणि करिअरमधील वाढीसाठी शुभ मानला जातो.

मालव्य राजयोग (१८ सप्टेंबर २०२६): शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा ‘मालव्य राजयोग’ भौतिक सुख-सुविधा, संपत्ती आणि ऐश्वर्य मिळवून देतो.

‘या’ ४ राशींना होणार सर्वात मोठा फायदा

कन्या: तुमच्या राशीत बुध ग्रहाच्या आगमनामुळे भद्र आणि लक्ष्मी नारायण या दोन्ही राजयोगांचा प्रभाव राहील. अडकलेले पैसे परत मिळतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समाजातील प्रतिष्ठा वाढेल.

तूळ: शुक्र ग्रहाचे तुमच्याच राशीत होणारे भ्रमण ‘मालव्य राजयोग’ बनवेल. व्यवसायात मोठा नफा होईल, नवीन व्यावसायिक संबंध जोडले जातील आणि नोकरदार लोकांना पदोन्नती (प्रमोशन) मिळू शकते.

मकर: सप्टेंबर महिना मकर राशीच्या लोकांसाठी भाग्योदय घेऊन येत आहे. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील आणि उत्पन्नात सातत्याने वाढ होईल.

कुंभ: हा त्रिग्रही आणि राजयोगांचा संयोग कुंभ राशीसाठी खूप शुभ ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी मिळेल. घरात मांगलिक कार्ये पार पडतील आणि वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)