September Horoscope: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. २६ सप्टेंबर २०२६ रोजी बुध ग्रह कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र ग्रह आधीपासूनच असणार आहे. अशा स्थितीत तूळ राशीत बुध आणि शुक्राची युती होऊन लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, व्यापार आणि तर्काचा कारक मानले जाते, तर शुक्र ग्रह धन, सुख-सुविधा, प्रेम आणि भौतिक सुखाशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांचा संयोग आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
लक्ष्मी नारायण राजयोग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार कुंडलीत बुध आणि शुक्राची स्थिती शुभ असेल, तर लक्ष्मी नारायण योग तयार होतो. हा योग धन, वैभव, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि सुख-सुविधांशी जोडला जातो. गोचराच्या काळात जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्यांच्या स्थानानुसार आणि ग्रहांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या राशींवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
यावेळी हा योग तूळ राशीत तयार होणार आहे. काही ज्योतिषीय गणनांनुसार, याचा परिणाम अनेक राशींसाठी करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक ठरू शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग शिक्षण, करिअर आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
हा योग तूळ राशीतच तयार होणार असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी त्याचे महत्त्व अधिक वाढते. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख मजबूत होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी आणि फायदा मिळू शकतो. पार्टनरशिपशी संबंधित कामांमध्येही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला ठरू शकतो. कमाईचे नवीन मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढू शकतो, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या आर्थिक योजनांना गती मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
