September Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. त्यातही शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सौंदर्य, पैसा, भौतिक सुख-सुविधा आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या राशीबदलाचा परिणाम व्यक्तीच्या आर्थिक स्थितीपासून ते प्रेम आणि कौटुंबिक जीवनापर्यंत पाहायला मिळतो.

सध्या शुक्र ग्रह नीच राशी कन्या राशीत गोचर करत आहेत. मात्र सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र मोठा राशीबदल करणार आहेत. ६ सप्टेंबरला शुक्र राशी परिवर्तन करून स्वतःच्या स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करतील. त्यामुळे शुक्र नीच अवस्थेतून बाहेर येऊन अनुकूल स्थितीत येतील.

शुक्राच्या या राशीबदलाचा काही राशींना विशेष फायदा मिळू शकतो. विशेषतः वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण वृषभ आणि तूळ या दोन्ही राशींचा स्वामी शुक्र ग्रह आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

शुक्राच्या राशीबदलामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. ६ सप्टेंबरनंतर नशीब तुमची साथ देईल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. कौटुंबिक संबंधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेम जीवनात सुरू असलेले चढ-उतार कमी होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा राशीबदल विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. शुक्राच्या कृपेमुळे तुमच्या काही मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होतील. करिअरशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या काही लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता असून उत्पन्नातही वाढ होण्याचे योग आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो आणि चांगले व्यवहार करण्यात यश मिळू शकते. तसेच ६ सप्टेंबरनंतर आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल जाणवू शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)