Budh Gochar: बुध ग्रह ७ सप्टेंबरला सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. बुधाच्या या गोचरामुळे बुध आणि राहू यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होईल. याचे कारण म्हणजे बुध राहूपासून आठव्या भावात असेल, तर राहू बुधापासून सहाव्या भावात असेल. ज्योतिषशास्त्रात षडाष्टक योग हा प्रतिकूल परिणाम देणारा मानला जातो. हा योग २६ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

अशा परिस्थितीत या योगामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी, चला जाणून घेऊया.

मेष राशी (Aries Horoscope)

षडाष्टक योगाच्या काळात बुध तुमच्या कुंडलीतील त्रिक भावांपैकी एका म्हणजेच सहाव्या भावात असेल. तर राहू तुमच्या अकराव्या भावात आहे. त्यामुळे पैशांशी संबंधित बाबतीत तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. कोणाला पैसे उधार देताना किंवा घेताना काळजी घ्या. घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा.

या राशीच्या ज्या लोकांचे काम मीडिया क्षेत्रात आहे, त्यांनी बोलताना शब्दांचा विचार करून वापर करावा. यासोबतच काही लोकांना पोट आणि त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. उपाय म्हणून गणपतीची पूजा करावी.

तूळ राशी (Libra Horoscope)

बुध ग्रहाचे गोचर ७ सप्टेंबरला तुमच्या बाराव्या भावात होईल. त्यामुळे षडाष्टक योगामुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. योग्य बजेट तयार करून त्यानुसार पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत कमतरता जाणवू शकते. योग आणि ध्यान केल्याने फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम गांभीर्याने करा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

प्रेमसंबंधांच्या बाबतीतही तूळ राशीच्या लोकांनी सावध राहावे. गैरसमजामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. उपाय म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करावी.

मीन राशी (Pisces Horoscope)

षडाष्टक योगाच्या काळात करिअरशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी आपले प्रयत्न आणखी वाढवावे.

वाईट संगतीपासून दूर राहा, अन्यथा तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतात. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील, तर पैसे देणारे लोक तुमच्यामागे लागू शकतात. त्यामुळे योग्य बजेट तयार करून भविष्यासाठी नियोजन करा. प्रवास करतानाही सावध राहा. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाची पूजा करावी.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)