September Horoscope: कर्मफळ देणारा शनी आणि ग्रहांचा राजकुमार बुध एकमेकांसोबत ठराविक कोनात येऊन विशेष योग तयार करणार आहेत. शनी आणि बुध ग्रह १ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ०५:३६ वाजता एकमेकांपासून १५०अंशांच्या कोनात येऊन षडाष्टक योग तयार करतील. हा योग काही काळ सक्रिय राहणार आहे. त्यामुळे ४ राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्यापासून आर्थिक लाभ आणि सुख मिळण्यापर्यंत अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींना या योगामुळे मोठा फायदा होणार आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध-शनीचा षडाष्टक योग विशेष फायदेशीर ठरणार आहे. खर्च कमी होतील. जीवनातील नकारात्मकता दूर होईल. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. शिक्षण घेणाऱ्या लोकांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग समृद्धी आणि यश घेऊन येणार आहे. प्रॉपर्टीशी संबंधित समस्या संपतील. मोठी गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील. मन शांत राहील आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळेल. बोलण्याची पद्धत आकर्षक होईल.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ परिणाम घेऊन येणार आहे. बऱ्याच काळापासून केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल. हा काळ आर्थिक समृद्धीचा आहे. नोकरीमध्ये पद वाढू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सुरू असलेले मतभेद संपतील. नात्यांमधील गैरसमज दूर होतील.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. बऱ्याच काळापासून सुरू असलेला संघर्ष संपेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)