September Horoscope: सप्टेंबरमध्ये अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. २ सप्टेंबरला शुक्र तुला राशीत प्रवेश करेल, तर ७ सप्टेंबरला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल, तर २६ सप्टेंबरला बुध पुन्हा राशी बदलून तूळ राशीत प्रवेश करेल. तर १८ सप्टेंबरपासून मंगळ कर्क राशीत आपला प्रवास सुरू करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे हे गोचर आणि त्यातून तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे हा महिना ३ राशींसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या राशींच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, या कोणत्या राशी आहेत.

वृषभ राशी (Taurus)– आई लक्ष्मीच्या कृपेने पैशांचे नवे मार्ग खुले होतील

वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ ठरणार आहे. आई लक्ष्मीच्या कृपेने पैशांचे नवे मार्ग खुले होतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरमध्ये मोठी प्रगती पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल आणि या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते.

मिथुन राशी (Gemini)- आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल

मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना भाग्यवान ठरणार आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला फायदा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळेल. व्यवसायात एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

तूळ राशी (Libra)- तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल

तुला राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप शुभ ठरणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती आणि प्रमोशनचे योगही आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अनेक मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता दिसत आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)