scorecardresearch

शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केल्याने दोन राशींची अडीचकीपासून सुटका, कर्क आणि वृश्चिक रास फेऱ्यात

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

shani-dev-2
शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केल्याने दोन राशींची अडीचकीपासून सुटका, कर्क आणि वृश्चिक रास फेऱ्यात

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. न्यायदेवता शनिदेव २९ एप्रिल रोजी त्यांच्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जेव्हा जेव्हा शनिदेव राशी बदलतात तेव्हा काही राशींवरील अडीचकीचा प्रभाव संपतो, तर काही राशींना सुरू होतो.

शनिदेवाने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शनि प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनि अडीचकीपासून मुक्ती मिळाली आहे. या राशींच्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि त्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल. यासोबतच तुम्हाला जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. नशीब तुमची साथ देईल आणि व्यवसायात मोठा करार निश्चित करु शकाल. नवीन नोकरी मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल, तर वेतनवाढ आणि पदोन्नती होऊ शकते. गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. विद्यार्थ्यांनाही नशिबाची साथ मिळेल. ५ जून रोजी शनि वक्री स्थितीत जाईल आणि १२ जुलैपासून वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश करतील. या राशीत शनि ग्रहाच्या पुनरागमनामुळे मिथुन आणि तूळ राशीचे लोक पुन्हा शनिदेवाच्या प्रभावाखाली येतील. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना काही काळ शनीच्या अडीचकीपासून मुक्ती मिळेल.

बुध ग्रह ६८ दिवस वृषभ राशीत राहणार, या तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवांची तूळ ही उच्च रास आहे आहे आणि मेष ही निचांकी राशी आहे. २७ नक्षत्रांमध्ये पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचा स्वामित्व शनिदेवांकडे आहे. तसेच बुध आणि शुक्र यांच्याशी शनिदेवाची मैत्री असून सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात. शनीच्या संक्रमण कालावधीचा कालावधी सुमारे ३० महिने आहे. तसेच शनीची महादशा १९ वर्षांची आहे. जर कुंडलीत शनि मजबूत स्थितीत असेल तर व्यक्तीला आयुष्यात कधीही आरोग्याची चिंता नसते. तसेच सर्व कामे वेळेत होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani adichaki start for vruschik and kark rashi rmt

ताज्या बातम्या