scorecardresearch

२१ एप्रिलला शनि व गुरू एकत्र येताच ‘या’ ४ राशी होतील श्रीमंत? तन मन धन ‘असे’ होऊ शकते समृद्ध

Shani Transit With Jupiter In 2023: २१ एप्रिलला गुरु ग्रहाचे गोचर होताच शनी व गुरुची युती होणार आहे. यामुळे येत्या काळात ही युती ४ राशींच्या भाग्यास कलाटणी देऊ शकते.

२१ एप्रिलला शनि व गुरू एकत्र येताच ‘या’ ४ राशी होतील श्रीमंत? तन मन धन ‘असे’ होऊ शकते समृद्ध
२१ एप्रिलला शनि व गुरू एकत्र येताच 'या' ४ राशी होतील श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Transit With Jupiter In 2023: १७ जानेवारी २०२३ रोजी शनीने मकर राशीतून वायुतत्वाच्या बौद्धीक कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. तर २१ एप्रिलला गुरु ग्रहाचे गोचर होताच शनी व गुरुची युती होणार आहे. यामुळे येत्या काळात ही युती ४ राशींच्या भाग्यास कलाटणी देऊ शकते.

शनी व गुरु ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभाची संधी

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीला शनी आठवा येत आहे, पण तो कुंभ राशीत असल्यामुळे संकटावर मात करण्याची हिंमत जरूर येईल. विशेषत: ज्येष्ठ लोकांनी विशेष काळजी घ्यावी. काहीशी चंचलता लहरीपणा वाढेल त्यामुळे निर्णय घेण्यातील ठामपणा हरवू नका. कारण सार्वजनिक जीवनांत आपले हसे होऊ नये. लोक प्रवाहाच्या विरोधात बोलणे. पुरोगामी असल्याचा आव आणणे अतिस्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरुप देणे टाळा. परंतू हा शनी एप्रिलनंतर गुरुच्या शुभयोगात येत असल्याने खूपशी स्थिती बदलेल. उत्साह वाढेल. आर्थिक, मानसिक बळ वाढेल जीवनांत एक सुसुत्रता प्राप्त होईल.

तूळ (Libra Zodiac)

या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सद्पयोग करावा.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

हे ही वाचा<< माघी गणेश जयंतीला जुळले ‘हे’ ३ अत्यंत शुभ मुहूर्त; बाप्पा भक्तांची विघ्न दूर करून देणार श्रीमंतीची संधी

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. विशेष म्हणजे शुक्र बुधाचे विशेष कृपा छत्र लाभेल त्यातून समस्या दूर होतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या