scorecardresearch

१८ मार्चपर्यंत शनी महाराज ‘या’ राशींना देतील सोन्यासारखं आयुष्य; आजपासून नशिबाला कलाटणी देत होईल धन वर्षाव

Shani Asta Surya Power: शनी अस्त झाल्यावर सूर्याचा प्रभाव वाढणार आहे परिणामी शनीची शक्ती कमी व सूर्याचा प्रभाव अधिक अशी अवस्था निर्माण होणार आहे.

Shani Asta 11th February Saturn To be Shadowed By Surya These Three Rashi To Get 360 Degree Change In Destiny Earning Money
११ फेब्रुवारी ते १८ मार्च 'या' राशींना आहे कोट्याधीश होण्याची संधी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Astha Effect On Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर, उदय, अस्त करत असतो. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर शुभ- अशुभ स्वरूपात व कमी- अधिक प्रमाणात होत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाचे विशेष महत्त्व आहे. शनीच्या चालीत किंचितही बदल झाल्यास प्रभावित राशींच्या आयुष्यात काहीतरी उलथापालथ होते असं मानलं जातं. आज म्हणजेच ११ फेब्रुवारीला शनीदेव संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. १८ मार्च पर्यंत शनी महाराज याच स्थितीत विराजमान असणार आहेत. शनी अस्त झाल्यावर सूर्याचा प्रभाव वाढणार आहे परिणामी शनीची शक्ती कमी व सूर्याचा प्रभाव अधिक अशी अवस्था निर्माण होणार आहे. हा कालावधी काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो. सूर्याच्या चैतन्याने या राशींच्या आयुष्यात नवी झळाळी येऊ शकते. या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे पाहूया..

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा अस्त हा तूळ राशीसाठी आनंदाने व सुखाने भरलेला काळ घेऊन येणार आहे. आजपासून १८ मार्चपर्यंत आपल्या अनेक मोठ्या इच्छा पूर्ण होतील तसेच कामे मार्गी लागतील. तूळ राशीच्या मंडळींना प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचा योग आहे. या कालावधीत भौतिक सुख- सुविधा आपल्या वाट्याला येतील. वाडवडिलांच्या संम्पत्तीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. समाजातील स्थान बळकट होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने आपण एखादे मोठे काम पूर्ण करू शकता ज्यातून प्रचंड मोठा धनलाभ संभवतो.

Hindu New Year 2024
३० वर्षांनी गुढीपाडव्याला ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? नववर्षात शनिदेव देऊ शकतात अपार श्रीमंती
100 Years Later Chaturgrahi yog on Tilkund Chaturthi These three Zodiac Signs To Earn Ganpati Bappa Lakshmi Ma Blessing Rich Life Astrology
१०० वर्षांनी तिलकुंद चतुर्थीला चतुर्ग्रही योग; आजपासून ‘या’ राशींना अचानक लाभेल गणेश व लक्ष्मीकृपा, व्हाल धनाढ्य
Budh Gochar 2024
१३ दिवसांनी ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? शनि महाराजांच्या राशीत बुधदेव गोचर करताच लक्ष्मी येऊ शकते दारी
Shani Maharaj Great Blessing These Rashi For Next 331 Days If You Make Changes In Karma Will Get Huge Money Lakshmi Astrology
३३१ दिवस ‘या’ राशींवर शनिदेव असणार मेहेरबान; कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा, बघा तुम्हाला आहे का ही संधी?

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मागील वर्षीच शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली मिथुन रास या वर्षी सुद्धा धनलाभाच्या व सन्मानाच्या संधी मिळणार आहे. खूप काळापासून अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात ज्यातून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य सुधारेल. पती- पत्नीच्या नात्यात गोडवा वाढू शकतो. या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मेहनतीला पर्याय शोधू नका. विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ सांगून येऊ शकते. आयुष्यात नव्या व्यक्तीची किंवा वस्तूची जोड लाभू शकते व याच माध्यमातून काही महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात.

हे ही वाचा <<‘धनाचा दाता’ ग्रह मकर राशीत प्रवेश करून ७ मार्चपर्यंत ‘या राशींना देईल करोडपती बनण्याची संधी, प्रेमही बहरेल

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी अस्त झाल्याने मेष राशीच्या करिअरला खूप वेग मिळणार आहे. कित्येक वर्षांपासून आपण करत असलेल्या मेहनतीचे फळ हाती येऊ शकते. वरिष्ठांना आपले कष्ट दिसून येतील. आपल्याला नव्या नोकरीच्या संधी सुद्धा चालून येऊ शकतात. समाजात मान- सन्मान वाढीस लागू शकतो. प्रतिष्ठा वाढल्याने आपल्याला नव्या जबाबदाऱ्या सुद्धा स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय करत असल्यास त्यातून नवी लोकं आपल्याशी जोडली जातील व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani asta 11th february saturn to be shadowed by surya these three rashi to get 360 degree change in destiny earning money svs

First published on: 11-02-2024 at 09:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×