ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगतावर दिसून येतो. ग्रहांच्या चालीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. ग्रहांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे काही राशींना याचे शुभ परिणाम मिळतात. तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतात. जानेवारी महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीत बदल झाला आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी ३१ जानेवारी पर्यंतचा काळ शुभ राहील
मिथुन राशी
मिथुन राशीसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा शुभ राहील. याकाळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कोणतीही कामे पूर्ण होऊ शकतात. तसंच यावेळी तुम्हाला तुमच्या मित्राच्या मदतीने नवीन नोकरी मिळू शकते. तसंच याकाळात तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. आधीपासून चालत असलेले मतभेद दूर होतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर यावेळी तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. तसंच समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढेल.
सिंह राशी
जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्ही नवीन कपड्यांची खरेदी कराल. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर यावेळी पदोन्नती किंवा बढती होण्याची शक्यता आहे. याकाळात तुमच्या घरात धार्मिक कार्य असतील. याशिवाय तुम्ही लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे
यावेळी तुम्ही एखादी नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता, यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ मिळेल.
तूळ राशी
जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुमची बदली होऊ शकते. या काळात तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने इतर ठिकाणी जावे लागेल. याशिवाय तुम्हाला या आठवड्यात मित्राचे सहकार्य मिळेल. तसंच जर तुम्ही नवीन गोष्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
( हे ही वाचा: वसंत पंचमीपासून ‘या’ राशी होतील धनवान? माता सरस्वतीच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत)
मकर राशी
मकर राशीसाठी शेवटचा आठवडा चांगला सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला मालमत्तेतून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या आईकडून देखील तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर यावेळी तुमची बदली होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तसंच नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे.