Shani Combust 2026 Effects On Zodiac Signs : न्यायदेवता शनी अस्ताच्या काळ जवळ आला आहे. सूर्य मीन राशीत प्रवेश करताच शनीची शक्ती कमी होईल आणि त्याचे अशुभ परिणामदेखील कमी होऊ शकतात. विशेषतः शनीच्या अस्तामुळे सध्या शनीच्या साडेसातीच्या काळात असलेल्या दोन राशींच्या लोकांना फायदा होईल.

द्रिक पंचांगानुसार, १३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी शनीचा मीन राशीत अस्त होईल. शनीच्या अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल; पण अशा तीन राशी आहेत की, त्या राशींच्या लोकांवर याचा शुभ परिणाम दिसून येऊ शकतो. मेष, कुंभ व वृश्चिक अशा त्या तीन राशी आहेत. त्यापैकी मेष व कुंभ सध्या शनीच्या साडेसातीच्या काळातून जात आहेत. मात्र, १३ मार्च २०२६ नंतर या राशीवाल्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल. २२ एप्रिल २०२६ रोजी शनीचा उदय होईल.

मेष

शनीच्या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात मेष राशी आहे आणि या राशीत जन्मलेल्यांना त्याच्या अस्तामुळे मोठा दिलासा मिळेल. त्यांना साडेसातीच्या कठोर परिणामांपासून आराम मिळेल. त्यांचा खर्च कमी होईल, ज्यामुळे त्यांना बचत करता येईल. त्यांची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला परदेशांतून पैसे मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा व्यवसाय वाढू शकतो.

वृश्चिक

शनीच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळू शकतात. या व्यक्तींना धैर्य आणि आत्मविश्वास मिळेल, ज्यामुळे ते महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक मोठ्या व्यवहारांसंबंधित करारांना अंतिम स्वरूप देऊ शकता; पण त्यांच्या मुलांकडून काही समस्या येऊ शकतात.

कुंभ

सध्या कुंभ राशीत शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. शनीचा अस्त होताच कुंभ राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. नवीन मार्गांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावता येऊ शकतो; पण खर्च वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. कारण- यामुळे वाद होऊ शकतात.