Shani-Budh Dwidwadash Drishti: ज्योतिषशास्त्रानुसार शनीला सर्वाधिक प्रवाभी ग्रह म्हटले जाते. शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी सध्या मीन राशीत विराजमान असून तो वेळोवेळी त्याच्या स्थितीमध्ये बदल करत आहे. तर दुसरीकडे बुध या महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. बुध लवकरच मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. येत्या ९ मे २०२५ रोजी रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी बुध आणि शनी एकमेकांपासून ३० डिग्रीवर असतील. ज्यामुळे द्विद्वादश योग निर्माण होईल. हा योग खूप प्रभावी मानला जातो.
पंचांगानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या घरात असतात किंवा एकमेकांपासून ३० डिग्रीवर असतात तेव्हा हा योग निर्माण होतो.
‘या’ तीन राशींची होणार चांदी
तूळ (Tula Rashi)
द्विद्वादश योगाच्या प्रभावाने तूळ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.
मकर (Makar Rashi)
द्विद्वादश योगाच्या प्रभावाने मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही द्विद्वादश योग खूप लाभकारी सिद्ध होईल. या योगाच्या प्रभावाने तुम्हाला अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरूच्या सानिध्यात राहिल्यास गुरूचा आर्शीवाद प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)