Shani-Budh Yog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पडतो. सध्या शनीदेव मीन राशीत विराजमान असून २०२६ मध्ये देखील शनी याच राशीत विराजमान असेल. येणाऱ्या नव्या वर्षात इतर काही ग्रहांच्या चालीत बदल होईल.

पंचांगानुसार, बुध आणि शनी ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी एकमेकांपासून ३० डिग्री कोणीय अंतरावर असतील. या योगाला ज्योतिषशास्त्रात ‘द्विद्वादश योग’ म्हटले जाते. हा योग तब्बल ३० वर्षांनंतर निर्माण होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.

द्विद्वादश योग ‘या’ राशींना छप्परफाड धन देणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाचा योग खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीसाठी देखील हा योग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.अनेक अडचणी सुटतील आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुख नांदेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी शनी-बुधाचा योग खूपच आनंददायी ठरेल. नवीन संपत्ती खरेदी करू शकता. पैशांच्या अडचणी दुर होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाचा योग नक्कीच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग लाभदायी निर्माण होईल. शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)