Saturn Mercury conjunction November 2025: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफलदाता आणि न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. शनी ग्रह हा सर्वांत संयमी, प्रभावशाली व कठोर ग्रह मानला जातो. इतर ग्रहांच्या तुलनेत शनीचा वेग अत्यंत मंद असतो, त्यामुळे तो एका राशीत दीर्घकाळ राहतो. म्हणूनच जेव्हा शनीची दृष्टी किंवा युती इतर ग्रहांशी होते, तेव्हा ती कधी कधी अतिशय शक्तिशाली राजयोग निर्माण करते.

सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि या हालचालीमुळे काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. विशेष बाब म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ वाजून १२ मिनिटांनी शनी-बुध एकमेकांपासून १२० अंशावर येणार आहेत, ज्यामुळे ‘नवपंचम राजयोग’ निर्माण होईल, असं ज्योतिषीय गणनांमधून दिसतं. त्याच दिवशी बुध ग्रह संध्याकाळी तूळ राशीत प्रवेश करेल. म्हणजेच शनी आणि बुध हे एकमेकांच्या पंचम व नवम स्थानात असतील आणि या दुर्मीळ युतीमुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळण्याची शक्यता निर्माण होते. चला जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या तीन भाग्यशाली राशी…

बुध आणि शनी महाराजांचा आशीर्वाद मिळणार ‘या’ भाग्यवान राशींना

धनू (Sagittarius)

शनी-बुध युतीचा हा योग धनू राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ मानला जातो. शनी हा चौथ्या भावाचा आणि बुध हा लाभ भावाचा अधिपती असल्याने या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात चांगली प्रगती, वरिष्ठांचे सहकार्य व अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही जुन्या इच्छा किंवा त्यांची अडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात सौहार्दता वाढेल आणि कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होतील. ज्यांच्या मनात नवीन गुंतवणुकीचे विचार आहेत, त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.

कुंभ (Aquarius)

हा नवपंचम राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी सुखद आणि परिवर्तनशील काळ घेऊन येऊ शकतो. सध्या या राशीमध्ये शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे हळूहळू नकारात्मकता कमी होत जाऊन, परिस्थिती सकारात्मक दिशेने वळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, घरात शांतता आणि आनंद वाढेल. विदेशांत काम करणाऱ्या किंवा बहुराष्ट्रीय क्षेत्राशी निगडित लोकांना विशेष फायदा मिळू शकतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर स्थैर्य वाढेल.

मिथुन (Gemini)

हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी नव्या संधी आणि प्रगतीचा काळ ठरू शकतो. या काळात बुध नवम भावात आणि शनी दशम भावात विराजमान असल्याने करिअर, व्यवसाय व शिंक्षण या सर्वच क्षेत्रांत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. दीर्घकाळ अडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य संधी मिळू शकते आणि आधीच नोकरीत असलेल्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठ्या डील्स किंवा नफ्याच्या संधी लाभू शकतात. घर, वाहन किंवा संपत्तीविषयक निर्णय घेण्यासाठीही हा काळ शुभ मानला जातो.

एकंदरीत पाहता, ३० वर्षांनंतर तयार होणारा हा दुर्मीळ शनी-बुध नवपंचम राजयोग काही राशींच्या लोकांसाठी मोठ्या बदलांची दारं उघडू शकतो. या काळात संयम, नियोजन व आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय भविष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात, असं ज्योतिषीय गणनांवरून सूचित होतं.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)