Shani-Budh Yuti 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पडतो. सध्या शनीदेव मीन राशीत विराजमान असून २०२६ मध्ये देखील शनी याच राशीत विराजमान असेल. येणाऱ्या नव्या वर्षात इतर काही ग्रहांच्या चालीत बदल होईल. पंचांगानुसार, बुध ग्रह ११ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत आधीपासूनच शनी उपस्थित आहे. त्यामुळे मीन राशीत शनी-बुधाची युती निर्माण होईल. या दोन ग्रहांची युती नक्कीच काही राशींसाठी लाभकारी सिद्ध होईल.
शनी-बुध ‘या’ राशींवर छप्परफाड पैसा देणार
मकर (Makar Rashi)
मकर राशीसाठी देखील ही युती अत्यंत लाभदायी ठरेल. अनेक अडचणी सुटतील आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात सुख नांदेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या लोकांसाठी शनी-बुधाची युती खूपच आनंददायी ठरेल. नवीन संपत्ती खरेदी करू शकता. पैशांच्या अडचणी दुर होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाची युती नक्कीच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

