Shani Dev News In Marathi : शनिदेव १८ ऑगस्ट रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याची अशुभ फळ मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते. शनिचा अशुभ प्रभावापासून प्रत्येक जण घाबरतो. शनिच्या अशुभ परिणामांमुळे काही लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो तसेच शुभ परिणामांमुळे आयुष्यात सुख समृद्धी मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत की शनि नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. मेष राशी या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि इतर कामामध्ये चांगले परिणाम दिसून येईल. घर कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण दिसून येईल. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल. या लोकांचा कमाईचा स्त्रोत वाढेल. वृषभ राशी या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल. धनप्राप्तीचा योग जुळून येईल. कला व संगीतमध्ये ऋची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील. नोकरीची जागा बदलू शकते. कमाईमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंब जीवनात सुख समृद्धी नांदेल. संपत्तीमुळे आर्थिक वृ्द्धी होऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. हेही वाचा : २८ मार्चपर्यंत ‘या’ तीन राशींवर राहील शनिदेवाची कृपा, होणार गडगंज श्रीमंत? सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडून येतील. उच्च शिक्षण किंवा इतक कामासाठी विदेश यात्रेचे योग जुळून येतील. मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवणार. आत्मविश्वास वाढल्याने अनेक कामात हे लोक यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कन्या राशी या राशीच्या लोकांचे मन शांत राहीन. शैक्षणिक कार्यात यांना फायदा दिसून येईल. इतर कार्यांसाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचे मार्ग दिसून येतील. कमाईचे स्त्रोत वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. भरपूर धन लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धनु राशी या राशीच्या लोकांना सुख समृद्धी लाभेल. आई वडीलांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कमाई कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग दिसून येत आहे. घरात धार्मिक कार्य घडून येतील. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येत आहे. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)