Shani Nakshatra Parivartan 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रात शनिला महत्त्वाचं स्थान आहे. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देत असतात. शनी अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. शनीचा शुभ प्रभाव असलेला व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. वैदिक पंचांगानुसार, १८ ऑगस्ट २०२४ रोजी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनीची ही स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. शनिदेवाच्या या नक्षत्र परिवर्तनातून काही राशींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. पाहूया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत. 

शनी नक्षत्र बदल करताच ‘या’ राशींचे चमकणार भाग्य?

मेष राशी (Aries Zodiac)

शनीच्या नक्षत्रात होणारा बदल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. तसंच, जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते. उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात प्रवासाचीही शक्यता आहे. तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते.

Shani Gochar 2025
शनी महाराज घर सोडताच ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार, येणार अच्छे दिन? २०२५ मध्ये शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Budh Gochar 2024
९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी
Sun transit in leo transformation of Sun's sign will get position and money
उद्यापासून चांदीच चांदी; सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार मान-सन्मान, पद अन् पैसा
Saturn enter purva bhadrapada nakshatra
शनिचा जबरदस्त प्रभाव; पुढील काही तासांत ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
saturn retrograde in aquarius The grace of Saturn will be persons five zodiac signs
दिवाळीपासून कमावणार पैसाच पैसा; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींवर असणार शनिची कृपा

(हे ही वाचा: देवगुरु घर सोडताच ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी? देवगुरु २०२५ मध्ये दोनदा गोचर करत देऊ शकतात अपार पैसा )

वृषभ राशी (Taurus Zodiac)

शनिदेवाच्या नक्षत्रात होणारा बदल वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल ठरु शकते. तुम्हाला पैसे मिळू शकतात. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामात तुम्हला चांगलं यश मिळू शकतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग लाभणार असून तुमचं बँक बॅलेन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता. नोकरीत बढती मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात मनासारखा जोडीदार येऊ शकतो. 

कुंंभ राशी (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र बदल शुभ ठरु शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)