Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवांना कर्मफळाचे दाता मानले जाते. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. सूर्यपुत्र शनिदेवांची कृपादृष्टी एखाद्या गरीब व्यक्तीलाही श्रीमंत बनवू शकते. तर ज्यांच्यावर त्यांची वाईट नजर पडते, त्यांचे चांगले आयुष्यही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे अनेक लोक शनिदेवांना घाबरतात. मात्र, ज्याची कर्मे चांगली असतात, त्याला त्याचे चांगले फळ नक्की मिळते.
शनिदेवांना कर्मफळाचे दाता मानले जाते. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. सूर्यपुत्र शनिदेवांची कृपादृष्टी एखाद्या गरीब व्यक्तीलाही श्रीमंत बनवू शकते. तर ज्यांच्यावर त्यांची वाईट नजर पडते, त्यांचे चांगले आयुष्यही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे अनेक लोक शनिदेवांना घाबरतात. मात्र, ज्याची कर्मे चांगली असतात, त्याला त्याचे चांगले फळ नक्की मिळते.
वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)
वृषभ ही शनिदेवांच्या आवडत्या राशींपैकी एक मानली जाते. या राशीच्या लोकांना आयुष्यात भरपूर यश, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते.
तूळ राशी (Libra Zodiac Sign)
तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवांची विशेष कृपा आणि आशीर्वाद असतो. त्यामुळे त्यांना भरपूर यश, धन, प्रसिद्धी आणि आनंद मिळतो.
मकर राशी (Capricorn Zodiac Sign)
मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. या राशीच्या लोकांवर शनिचा वाईट प्रभाव खूप कमी पडतो. साडेसाती किंवा अडीच वर्षांच्या शनीच्या काळातही त्यांना तुलनेने कमी त्रास होतो.
कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)
कुंभ राशीचे स्वामीही शनिदेव आहेत. या राशीच्या लोकांवर शनिदेवांची कृपा कायम राहते. त्यामुळे साधारण मेहनत करूनही त्यांना मोठे यश, प्रसिद्धी, प्रेम आणि समाजात मान-सन्मान मिळतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
