Shani dev favourite zodiac signs : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्मदेवता मानतात. शनिदेव हा व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतो. शनि देवाच्या कृपेने लोक आयुष्यात खूप यशस्वी होतात. अंक शास्त्रानुसार काही तारखांना जन्मेलेले लोक शनिदेवाचे अतिशय लोकप्रिय असतात. कोणत्या तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
शनिचा अंक हा आठ आहे. शनिला ८ नंबर खूप प्रिय आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल म्हणजेच ज्यांचा मूलांक आठ असेल, त्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा दिसून येते. शनिदेव या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. शनि देवाच्या आशीर्वादाने हे लोक आयुष्यात खूप पुढे जातात. यांच्यावर नेहमी शनिदेवाची कृपादृष्टी असते.
मूलांक ८ असलेले लोक आयुष्यात प्रत्येक अडचणीवर मात करतात. ते संकटांना घाबरत नाही. त्यांना आयुष्यात आव्हानांचा सामना करावा लागतो पण ते हार मानत नाही आणि शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते. कधी ही हार न मानण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना आयुष्यात खूप जास्त फायदा करून देतो.
मूलांक ८ असलेल्या लोकांमध्ये लीडरशीप गुण खूप चांगला असतो. हे लोक व्यावसायिक, नेता आणि सोशल वर्कर बनू शकतात. यांच्या टीमचे लोक यांच्यापासून खूप खूश राहतात. हे लोक ज्या क्षेत्रात जातात तिथे उंची गाठतात. हे लोक आयुष्यात खूप जास्त धन संपत्ती कमावतात. त्यांना आयुष्यात पैशांची कमतरता कधीही भासत नाही
मूलांक ८ असलेले लोक इंट्रोवर्ड स्वभावाचे असतात. ते कोणासमोरही व्यक्त होत नाही. पण कोणाबरोबर मैत्री केली तर आयुष्यभर निभावतात. ते नात्यांविषयी खूप गंभीर असतात. ते खूप मनापासून नाती जपतात.
या लोकांचे लव्ह लाइफसंबंधित नशीब चांगले तेवढे चांगले नसते. एकतर्फी प्रेमामुळे यांचे नाते टिकत नाही. लग्नानंतर ते त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. यांचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर असते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)