Saturn Transist: शनिदेव ‘या’ राशींच्या कुंडलीत बनवत आहेत महापुरुष राजयोग; ऑक्टोबरपर्यंत कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म दाता म्हटलं गेलं आहे. असे मानले जाते की ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

Saturn Transist: शनिदेव ‘या’ राशींच्या कुंडलीत बनवत आहेत महापुरुष राजयोग; ऑक्टोबरपर्यंत कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही
शनिदेव 'या' राशींच्या कुंडलीत बनवत आहेत महापुरुष राजयोग(फोटो: संग्रहित फोटो)

Saturn Transist: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म दाता म्हटलं गेलं आहे. असे मानले जाते की ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. ज्योतिष शास्त्रानुसार अडीच वर्षांनी शनिदेव आपली राशी बदलतात. तसंच, विशेष स्थितीत, याच्याही आधी शनीचे संक्रमण होते. ज्योतिष शास्त्रानुसार १२ जुलै २०२२ पासून शनिदेव मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत विराजमान आहेत. शनिदेव २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या स्थितीत राहणार आहेत. या काळात शनिदेव ३ राशीच्या कुंडलीत महापुरुष राजयोग बनवत आहेत. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांचे मते हा योग ज्यांच्या जन्मकुंडलीत तयार होतो, तो त्याच्यासाठी खूप शुभ असतो. चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, कोणत्या ३ राशींसाठी शनिदेवाने निर्माण केलेला महापुरुष राजयोग विशेष मानला जातो.

‘या’ ३ राशींच्या कुंडलीत शनिदेव महापुरुष राज योग बनवत आहेत

मिथुन राशी

शनिदेवाने निर्माण केलेल्या महापुरुष योगाच्या प्रभावामुळे करिअर आणि नोकरीत उत्तुंग यश मिळू शकते. या राशीचे जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहील. ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात देखील पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात इतर स्त्रोतांकडून आर्थिक लाभाचे योग होतील. परदेशातील कामात लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वैवाहिक जीवन सुद्धा चांगले राहील.

( हे ही वाचा: Venus Transist 2022: उरले फक्त काही तास! ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा)

मेष राशी

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीसाठी महापुरुष योग अत्यंत शुभ सिद्ध होईल. या योगाच्या शुभ प्रभावामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक राजकारणात आहेत, त्यांना या योगाचा विशेष लाभ होईल. तसेच, या कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. याशिवाय जे नोकरीत आहेत, त्यांच्या कामाचे कौतुक होऊन बढतीचा लाभ मिळू शकतो. एकंदरीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ मेष राशींच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे.

कन्या राशी

ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा हा राजयोग कन्या राशीला अचानक लाभ देऊ शकतो. जवळपास सर्वच कामात तुम्हाला यश मिळेल. एखादं रखडलेलं काम मार्गी लागेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. प्रवासात धनलाभाचे योग येतील. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. एखादी नवीन वस्तू विकत घेण्याचा योग येईल. लांबचा प्रवास कराल. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani dev is forming mahapurush rajyoga in the horoscope of this sign nothing bad will happen till october gps

Next Story
Shukra Gochar 2022: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल; लवकरच मिळेल आनंदाची बातमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी