Shani Vakri In June 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे कलियुगातील न्यायाधिकारी मानले जातात. याचा अर्थ प्रत्येक राशीला शनिदेव त्यांच्या कर्मानुसार शुभ- अशुभ फळ देत असतात अशी मान्यता आहे. यंदाचे वर्ष हे शनीच्या प्रचंड महत्त्वाच्या व मोठ्या उलाढालीचे वर्ष मानले जाते. या वर्षाच्या सुरुवातीलाच शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत तब्ब्ल ३० वर्षांनी स्थिर झाले होते. आताही शनिदेव आपल्याच राशीत तब्बल सहा महिन्यांनी वक्री होण्यास सज्ज झाले आहेत. ५ जून पासून शनी वक्री सुरु होणार असून १७ जूनला शनिदेव पूर्ण वक्री अवस्थेत असणार आहेत. शनी हा ग्रहमंडळातील सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळेच शनीच्या उलाढालीचे प्रभाव हे दीर्घकालीन ठरू शकतात. आता शनी वक्रीमुळे सुद्धा तब्बल ३० वर्षांनी ३ राशींच्या भाग्यात शश महापुरुष राजयोग निर्माण होत आहे. या शुभ योगामुळेया राशी रातोरात श्रीमंत होण्याची चिन्हे आहेत. नेमक्या या राशी कोणत्या व त्यांना धनलाभाशिवाय कोणते अन्य फायदे होऊ शकतात पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनी महाराज ३० वर्षांनी ‘या’ राशींच्या कुंडलीत देणार धनलाभ?

कुंभ रास (Aquarius Zodiac)

मुळातच कुंभ ही शनीच्या स्वामित्वाची रास मानली जाते. अशातच शनीदेव स्वतः आता कुंभ राशीत वक्री होणार असल्याने तुम्हाला लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वाला व विशेषतः स्वभावाला झळाळी मिळू शकते. तुमच्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहील अशा प्रकारची एखादी घटना लवकरच घडू शकते. तुम्हाला पार्टनरची मजबूत साथ लाभू शकते ज्यामुळेतुम्ही एखादी नवी गुंतवणूक किंवा तत्सम खरेदी करू शकता. यामुळे पुढील वर्षभरात आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या गोचर कुंडलीत सातव्या स्थानी शनिदेव भ्रमण करत आहेत. यामुळे येत्या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित मंडळींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच विवाहित मंडळींसाठी प्रेम व गोडवा वाढवणारा हा कालावधी ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या रूपात आपली परीक्षा होऊ शकते ज्यात तुम्ही घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय खूप सुख व प्रचंड धनलाभ घेऊन येऊ शकतो. एखाद्या छोट्या प्रवासाचे सुद्धा संकेत कुंडलीत आहेत.

हे ही वाचा<< एका वर्षाने बुध गोचरासह भद्रा राजयोग बनून ‘या’ राशी गडगंज श्रीमंत होणार? मोठा धनलाभ व वैभवप्राप्तीचा योग

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

शश महापुरुष राजयोग हा आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी तयार होत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला वाहन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते. तुम्हाला जुन्या इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग घडण्याची चिन्हे आहेत. जूनच्या मध्य कालावधीत तुमचे ग्रहबल अत्यंत मजबूत असल्याने तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या संधी मिळू शकतात. आईच्या व वडिलांच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. विनाकारण तुमच्याशी गोड वागणाऱ्यांपासून सावध रहा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)