Premium

शनीदेव पुढील दोन वर्ष ‘या’ ५ राशींना अच्छे दिन देऊन करणार मालामाल? तुमची रास कधी होऊ शकते कोट्याधीश?

Shani Gochar: शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावातील पहिला टप्पा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष पाच राशींचा सुखाचा काळ सुरु होऊ शकतो

Shani Dev Make These Five Zodiac Signs Wealthy With Crores Of Money Your Rashi Bhavishya Achhe Din Astrology News
शनीदेव पुढील दोन वर्ष 'या' ५ राशींना अच्छे दिन देऊन करणार मालामाल? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Blessing These Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. शनी हा नवग्रहांपैकी सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. यामुळे शनीचा किमान प्रभाव हा अडीच वर्षे व जास्तीत जास्त साडेसात वर्ष एखाद्या राशीवर टिकून राहू शकतो.शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावातील पहिला टप्पा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष पाच राशींचा सुखाचा काळ सुरु होऊ शकतो. दोन वर्षांमध्ये या राशींना प्रचंड धनलाभ व प्रगतीची संधी आहे. राशीनुसार वेगवेगळ्या मार्गाने तुम्हालाही धनलाभ होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. पुढील दोन वर्षात शनीदेव नक्की कोणत्या राशींना कोट्याधीश होण्याची संधी देऊ शकतात हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिदेव पुढील दोन वर्षात ‘या’ पाच राशींना देणार अपार श्रीमंती?

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत १० व्या स्थानी स्थिर असल्याने येथे या वर्षभरात शश महाराजयोग तयार होत आहे. ही स्थिती पुढील दोन वर्ष कायम असणार आहे. व्यवसायासाठी पुढील दोन वर्ष अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुम्हाला नशिबाची साथ लाभल्याने व भाग्यभावात शनिदेव स्थिर असल्याने तुम्हाला शनीचा आशीर्वाद लाभु शकतो. तुम्हाला क्रिएटिव्ह गोष्टी करण्याची संधी मिळू शकते, नाटक, लेखन, काव्य अशा क्षेत्रात तुम्ही मोलाची कामगिरी करू शकता.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या नवव्या स्थानी शनी देव स्थित आहेत त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. येणारी दोन वर्षे तुम्हाला राजयोग असल्याने तुम्ही परदेश प्रवास करू शकता. तसेच आध्यत्मिक विकासाने तुमची मानसिक स्थिती शांत व निवांत राहू शकते. नोकरदार मंडळींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश लाभू शकते.

सिंह राशी (Leo Zodiac)

शनिदेवा तुमच्या कुंडलीच्या सातव्या घरात प्रवेश करून भ्रमण करणार आहेत .यावेळी आपण कर्जमुक्त होऊ शकता. तसेच भागीदारीच्या कामात लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील आणि जे नोकरदार आहेत, त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. याउलट जोडीदारासोबत समन्वय चांगला राहील आणि जोडीदारामार्फत धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Zodiac)

शनिदेव तुम्हाला आनंददायी आणि लाभदायक कालावधी तयार करू शकतात. शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते यावेळी चांगले राहण्याची चिन्हे आहेत. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसंच नोकरीत पदोन्नती आणि वाढ होऊ शकते. तसेच यावेळी तुमचा मान-सन्मान वाढेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. मोठ्या भावंडांशी संबंध सुधारू शकतात. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.

हे ही वाचा << ‘या’ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना अतिचांगुलपणा नडतो? जवळच्या माणसांकडूनच घेतला जाऊ शकतो गैरफायदा

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीत पुढील अडीच वर्ष शनिदेव स्थिर असणार आहेत व त्याचा शुभ प्रभाव तुमच्या कामावर व प्रगतीवर दिसून येऊ शकते. शनिदेव पुढील अडीच वर्षात तुमच्या स्वप्नांना दिशा देऊ शकतील तसेच कौटुंबिक सुखही तुमच्या भाग्यात दिसून येत आहे. सूर्य व राहू भ्रमणाने तुमच्या राशीवर २०२३ च्या मध्यात काहीसा संकटाचा काळ येऊ शकतो पण या ही वेळेस शनिदेव तुमची ढाल बनू शकतील . तुमची आर्थिक स्थिती भक्कम होऊन तुम्हाला गुंतवणुकीचा मोठा फायदा होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीमुळे तुम्हाला प्रचंड मोठी धनलाभाचे संधी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 10:20 IST
Next Story
Horoscope : राशीभविष्य, रविवार ४ जून २०२३