ऑक्टोबरमध्ये शनिदेव मार्गी होणार; या ५ राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल | shani dev margi in october these zodiac sign get relief in shani sadesati and dhaiya prp 93 | Loksatta

ऑक्टोबरमध्ये शनिदेव मार्गी होणार; या ५ राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल

शनीच्या मार्गीमुळे ५ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे.

ऑक्टोबरमध्ये शनिदेव मार्गी होणार; या ५ राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल
१२ जुलै रोजी शनी ग्रह मकर राशीत वक्री झाला होता.

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. १२ जुलै रोजी शनी ग्रह मकर राशीत वक्री झाला होता आणि ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहे. मार्गी असणे म्हणजे शनी आता सरळ गतीने प्रवास करेल. शनीच्या मार्गीमुळे ५ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

या राशींना साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळेल
ज्योतिषशास्त्रानुसार १२ जुलै रोजी शनिदेव मकर राशीत परतले होते, त्यानंतर ते ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहेत. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू आहे. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर धैय्या सुरू आहे. जेव्हा शनिदेव वक्री चालीमध्ये भ्रमण करत होते, त्यावेळी या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. या लोकांच्या कामात अडथळा निर्माण झाला. व्यवसाय मंदावला होता. तसंच २३ ऑक्टोबरपासून शनिदेवाचे चाल बदलून मार्गी होणार आहे. त्यामुळे आता या लोकांची कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. जुन्या आजारापासून सुटका मिळू शकते.

वैदिक ज्योतिषात शनीचे महत्त्व:
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. तसेच ज्योतिषशास्त्रात त्याला न्याय-प्रिय देवता मानली जाते. तूळ राशीत शनिदेव श्रेष्ठ मानले जातात आणि मेष त्यांची दुर्बलता आहे.

दुसरीकडे शनिदेव हे पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचे स्वामी आहेत. त्यांना बुध आणि शुक्र यांच्यासोबत मैत्रीची भावना आहे. सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात. शनीच्या राशी परिवर्तनाचा कालावधी सुमारे ३० महिने आहे. तसेच शनीची महादशा ज्योतिषशास्त्रानुसार १९ वर्षांची मानली जाते.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवरात्रीनंतर सूर्य देव बदलणार राशी; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार

संबंधित बातम्या

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार २७ नोव्हेंबर २०२२
पुढील १२० दिवस ‘या’ तीन राशींचे नशीब अचानक पालटणार? मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
२९ डिसेंबर पर्यंत ‘या’ तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती
३० वर्षांनंतर शनिदेव करणार स्वतःच्या राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ राशींना मिळेल प्रचंड धनलाभाची संधी
२०२२ नोव्हेंबरच्या शेवटच्या ५ दिवसात ‘या’ राशींना अपार श्रीमंतीचे योग; तुम्हाला लक्ष्मीची साथ लाभणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात