नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात, शनिदेव वाईट आणि चांगल्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात, असं म्हटलं जाते. प्रत्येक अडीच वर्षांनी शनिच्या राशीत बदल होतो. जेव्हा जेव्हा शनिचे संक्रमण होते तेव्हा काही राशींवर त्याचा प्रभाव पडतो. शनि सध्या कुंभ राशीमध्ये पूर्वगामी अवस्थेत आहे, त्यामुळे ‘त्रिकोण राजयोग’ तयार झाला आहे. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये शनिदेव प्रत्यक्ष होताच ‘शश राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात, हे दोन्ही राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. या दोन्ही योगांचा प्रभाव वर्ष २०२३ अखेरपर्यंत राहील, त्यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो. तसेच नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळण्याचीही शक्यता आहे. पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना मिळणार अपार पैसा?

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो. या काळात नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करु शकतात.

3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
shani gochar 2024 saturn margi in kumbh these zodiac sign will be lucky
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशीच्या लोकांना लक्ष्मी देणार धनाचा हंडा! शनी मार्गस्थ असल्याने नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या

सिंह राशी

शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांवर शश आणि त्रिकोण राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. 

(हे ही वाचा: येत्या दोन दिवसात ‘या’ चार राशींचे सुखाचे दिवस सुरु? सूर्य-शनीचा अशुभ प्रभाव संपल्याने मिळू शकतो बक्कळ पैसा)

तूळ राशी

शनिदेवाच्या दोन्ही राजयोगांचा तूळ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो. या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग वरदानापेक्षा कमी असणार नाही. या काळात या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा लाभू शकते. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)