Shani Dev: शनिदेव ग्रह बदलणार, या ३ राशींना होऊ शकतो विशेष लाभ

शनि आता कुंभ राशीपासून मकर राशीत मागे जाईल, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल, पण ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी विशेष लाभ होऊ शकतो.

shani rashi
प्रातिनिधिक फोटो

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कर्मफळ देणारे शनिदेव १२ जुलै रोजी मकर राशीत संक्रमण करणार आहेत. वक्री म्हणजे कोणत्याही ग्रहाची विरुद्ध दिशेने होणारी हालचाल. म्हणजे शनि आता कुंभ राशीपासून मकर राशीत मागे जाईल, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल, पण ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी विशेष लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी.

मेष (Aries)

तुमच्या संक्रमण कुंडलीत शनिदेव दशम भावात प्रतिगामी असेल, ज्याला कर्मक्षेत्र आणि नोकरीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुमची मान- सम्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी वाहवाह होईल. तसेच यावेळी तुम्हाला राजकारणात यशही मिळू शकते. म्हणजे तुम्ही कोणतेही पद मिळवू शकता. यासोबतच तुम्ही शेअर मार्केटमध्येही चांगली कमाई करू शकता. तथापि, येथे पाहण्याचा मुद्दा हा आहे की शनिदेव तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानावर स्थित आहेत.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान)

धनु (Sagittarius)

शनिदेवाची प्रतिगामी स्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या द्वितीय स्थानात प्रतिगामी होणार आहेत. ज्याला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यांचे करिअर भाषणाशी निगडीत आहे, त्यांच्यासाठीही हा काळ फायदेशीर असणार आहे. त्याचबरोबर वाहन आणि जमीन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीसाठी काळ चांगला आहे. यावेळी तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता. तसेच यावेळी तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते आणि कोणतेही पद मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय शनि ग्रहाशी संबंधित असेल तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो.

(हे ही वाचा: Zodiac Sign: ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींचं नेहमीच एकमेकांशी जुळतं, विचारही पटतात!)

मीन (Pisces)

शनिदेवाची प्रतिगामी स्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण तुमच्या राशीवरून शनिदेव अकराव्या भागात प्रतिगामी होईल, ज्याला उत्पन्न आणि लाभाचे घर म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. व्यवसायात नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी, आपण व्यवसायात नवीन डील अंतिम करू शकता. तसेच व्यवसायात नफाही चांगला राहील. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय किंवा करिअर गुरु ग्रहाशी संबंधित असेल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani dev saturn will change the planet these 3 zodiac signs can be a special benefit ttg

Next Story
अपार संपत्ती मिळवण्यासाठी ‘ही’ ३ रत्ने आहेत खूपच फायदेशीर; जाणून घ्या कोण करू शकतात धारण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी