आज शनिवार म्हणजे शनि देवाचा दिवस आहे. या दिवशी शनिभक्त शनिची आराधना करतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांच्या हालचालीचा थेट परिणाम राशींवर पडत असतो. शनिदेवाच्या कृपने काही राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे, असे मानले जाते. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊया. मेष रास (Aries) ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आहे आणि तुम्ही योजना केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात. असं म्हणतात की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळू शकते आणि तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील पण खर्च खूप होऊ शकतो. हेही वाचा : शनीदेव शश, धन व केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ राशींना करतील करोडपती? १४० दिवस मिळू शकते नशिबाला कलाटणी कर्क रास (Cancer) ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशींना शनिदेव शुभ फळ देणार. असं मानले जाते की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना संकटातून बाहेर काढू शकता आणि धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. असं म्हणतात की नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते. हेही वाचा : तळहातावर जर ‘V’आकाराचे चिन्ह असेल तर नशिबाला मिळेल कलाटणी? मिळू शकतो अपार पैसा मकर रास (Capricorn) ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर आज शनिचा सकारात्मक प्रभाव दिसू शकतो. असं म्हणतात की नोकरी व्यवसायात सकारात्मक वातावरण असू शकते. असे मानले जाते की तुमच्या कामाची प्रशंसा केली जाऊ शकते. प्रॉपर्टी संबंधीत कामाला गती मिळू शकते आणि कामे मार्गी लागतील, असे मानले जात आहे. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)