Shani Dev Transit In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह- तारे वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतो. काही महत्त्वाचे ग्रह म्हणजेच शनी, मंगळ, गुरु यांचे राशी परिवर्तन सर्वात मुख्य व परिणामकारक ठरते. २०२३ हे वर्ष बहुतांश बड्या ग्रहांच्या उलाढालीचे वर्ष आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शनिदेव आपल्या स्वराशीत आले आहेत. १७ जानेवारीला ३० वर्षानंतर पहिल्यांदाच शनीचे कुंभ राशीत महागोचर झाले आहे. कुंभ राशीत शनिदेव चंद्र स्थानी विराजमान आहेत. हे स्थान ज्योतिष शास्त्रात अत्यंत शुभ व महत्त्वाचे मानले जाते. शनीचे हे स्थान येत्या वर्षभरात ४ राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. या मंडळींना धनलाभ व प्रगतीचे योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या हे जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष राशी (Aries Zodiac)

शनिदेव नवांश कुंडलीत असल्याने मेष राशीच्या मंडळींचा शुभ काळ सुरु होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत शनिदेव कर्माच्या व लाभाच्या ठिकाणी स्थित आहेत. नवांश कुंडलीत शनीचे स्थान उच्च आहे त्यामुळे आपण येत्या काळात कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करू इच्छित असाल तर नक्कीच शुभ योग आहेत. येत्या काळात आपल्याला अनपेक्षित व मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर मनासारखी संधी चालून येऊ शकते.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

शनि देव नवांश कुंडलीत असल्याने मिथुन राशीला अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. शनिदेव मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानी आहेत हे स्थान शैक्षणिक प्रगतीचे मानले जाते. येत्या काळात विद्यार्थी दशेतील मंडळींना मोठ्या संधी मिळू शकतात. केवळ शिक्षणच नव्हे तर यामुळे येत्या काळात आपल्याला धनलाभाचे सुद्धा योग आहेत. सरकारी नोकरी व परीक्षांमध्ये सुद्धा प्रगती लाभू शकते. संतती प्राप्तीसाठी सुद्धा येणार काळ हा लाभदायक ठरू शकतो.

हे ही वाचा<< PM Modi Astrology: नरेंद्र मोदी यांना २०२३ मध्ये किती व काय अडचणी येणार? जाणून घ्या पंतप्रधानांचं राशीभविष्य

धनु राशी (Dhanu Zodiac)

धनु राशीचे स्वामी गुरु आहेत. गुरु ग्रह सध्या स्वराशीतच विराजमान आहेत. शनिदेवाचे गोचर तुमच्या कुंडलीत धनस्थानी आहे तर गुरु ग्रह तिसऱ्या स्वामित्व स्थानी स्थिर आहे. या काळात परदेशी व्यवहार करणाऱ्यांना लाभदायक स्थिती असणार आहे. नवांश कुंडलीत शनी व गुरु उच्च स्थानी असल्याने व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. १७ जानेवारीपासून धनु राशीची शनी साडे साती सुद्धा दूर झाली आहे. यामुळे येत्या काळात तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यश प्राप्तीचा योग आहे.

हे ही वाचा<< Tarot Card: २०२३ मध्ये ‘या’ राशीच्या महिला करतील राज्य! लक्ष्मीची साथ लाभून मिळेल बक्कळ पैसे कमावण्याची संधी

मकर राशी (Makar Zodiac)

शनी देव नवांश कुंडलीत असल्याने मकर राशीला भाग्योदय होण्याचे संकेत आहेत. शनिदेव शुभ स्थितीत असल्याने नवांश कुंडलीत शुभ योग तयार होत आहे तर गोचर कुंडलीत शनिदेव दुसऱ्या स्थानी स्थिर आहेत. हे धनप्राप्तीचे स्थान असल्याने आपल्याला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. नोकरदार मंडळींना प्रमोशन व पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्त बाहेर जाण्याचे सुद्धा योग तयार होत आहे. येणारा काळ तुम्हाला सर्व इच्छापूर्तींचा ठरू शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev transit in kumbh navansh kundli these 4 zodiac signs can get huge money and increase bank balance svs
First published on: 29-01-2023 at 14:31 IST