Shani Jayanti 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनी देव करतात. अनेकदा शनीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनी देव न्याय देण्याचे सुद्धा काम करतात म्हणूनच त्यांची दुसरी ओळख न्यायदेवता अशी सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये शनिदेवाचे मीन राशीत संक्रमण झाले आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती (Shani Jayanti 2025) साजरी केली जाते. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी २६ मे रोजी दुपारी १२:११ वाजता सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, २७ मे रोजी रात्री ८:३१ वाजता संपेल. २७ तारखेला मंगळवार रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे.

२०२५ च्या शनि जयंतीला दुर्मिळ योगायोग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंतीच्या दिवशी शनि मीन राशीत असेल. यासोबतच, वृषभ राशीत बुध-सूर्य युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होईल. शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण होईल. याशिवाय, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह त्रिपुष्कर राजयोग निर्माण होत आहे. याशिवाय, हा दिवस मंगळवार देखील आहे. म्हणूनच, हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो. त्यामुळे काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा होऊ शकते. शनीच्या आशीर्वादाने प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..

शनिदेव ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी?

मेष

मेष राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने शुभ परिणाम मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहू शकतो. व्यवसायात नफा होऊ शकतो, उत्पन्नात वाढ होण्यासोबतच पदोन्नतीची शक्यता देखील आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन सुविधा उपलब्ध होऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना लवकरच नवीन नोकरी मिळू शकेल. तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळू शकेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती संपुष्टात येऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.