मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते. या दिवशी शनिदेवाची पूजा करून त्यांच्याशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. यावेळी मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारी (शुक्रवारी) आहे. या दिवशी सूर्य दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त १४ जानेवारी रोजी दुपारी २.२८ पासून सुरू होत आहे. अशा स्थितीत उदयतिथीला मानणारे भाविक १५ जानेवारीला उत्सव साजरा करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Makar Sankranti : मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच येते का? जाणून घ्या यामागची तथ्यं आणि सत्य

जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती येते. तसेच या दिवशी सूर्य दक्षिणायनापासून उत्तरायणात जातो. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेव पुत्र शनिदेवांना त्यांच्या घरी भेटतात आणि ते जवळपास एक महिना तिथे राहतात. यावेळी सूर्य ग्रहाच्या तेजासमोर शनिदेवाचे तेज मावळते. सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले तेव्हा त्यांनी वडिलांचे स्वागत काळ्या तिळाने केले होते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले होता. तेव्हा सूर्यदेवांनी तुझं घर धन-धान्याने भरलेलं राहिल असा आशीर्वाद दिला होता. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. त्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. त्यांनाही पूजेत काळे तीळ अर्पण करावेत. पूजेनंतर गरीब, गरजू लोकांना मोहरीचे तेल, काळे तीळ, तिळाचे लाडू, उबदार कपडे इत्यादी दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. मकर संक्रांतीच्या दिवशी तांदळाच्या दानाचेही विशेष महत्त्व आहे.

Makar Sankranti : सूर्यदेवांना त्यांच्या पत्नीने का दिला होता शाप? मकर संक्रातीशी निगडीत पौराणिक कथा

ज्योतिषांच्या मते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यापासून दुस-या आणि बाराव्या घरात गुरु आणि शुक्र असल्यामुळे उभयचर योग आणि चंद्रापासून दहाव्या घरात गुरूसारखे शुभ ग्रह आल्याने आमला योग तयार होत आहे. . हे दोन्ही योग भक्तांसाठी शुभ आहेत.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dosh remedies on makar sankranti 2022 rmt
First published on: 12-01-2022 at 12:53 IST