2027 Horoscope: २०२७ मध्ये शनीचे पहिले राशी परिवर्तन ३ जून रोजी होणार आहे. या दिवशी शनीदेव मेष राशीत प्रवेश करतील. त्यानंतर २० ऑक्टोबर २०२७ रोजी शनी दुसऱ्यांदा राशी बदलतील. या दिवशी शनीदेव पुन्हा आपल्या मागील गोचर राशी म्हणजेच मीन राशीत परत येतील आणि २३ फेब्रुवारी २०२८ पर्यंत ते तिथेच राहतील.
त्यानंतर न्यायाचे देवता शनी महाराज पुन्हा मेष राशीत आपला प्रवास सुरू करतील. जाणून घ्या, २०२७ मध्ये शनीचे दोनदा होणारे राशी परिवर्तन कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
शनीच्या दुहेरी गोचरामुळे ‘या’ ३ राशींना होणार फायदा
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२७ मध्ये शनीचा दुहेरी गोचर खूप शुभ ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती मिळू शकते. जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. व्यवसायात मोठा करार निश्चित होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठीही शनीचा गोचर लाभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला फायदा मिळू शकतो. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. मानसिक तणाव कमी होईल. घरात एखादा शुभ कार्यक्रम पार पडू शकतो.
वृश्चिक रास (Scorpio)
शनीचा दुहेरी गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवू शकता. कोर्ट-कचेरीतील प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.
शनीदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय
शनिवारी शनीदेवांची विधीपूर्वक पूजा करा. त्यांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि एक दिवा पिंपळाच्या झाडाखालीही लावा. या दिवशी गरजू लोकांना कपडे, अन्न, चप्पल, तीळ, तेल यांसारख्या वस्तूंचे दान करा. तसेच शनिवारी शनी चालीसा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
