scorecardresearch

शनिच्या लाडक्या मकर राशीसाठी २०२३ कसे जाणार? कधी होऊ शकतो प्रचंड धनलाभ तर कधी घ्यावी काळजी, पाहा

या राशीतील लोक जुलै २०२३ नंतर मालमत्ता खरेदी करू शकतात, आर्थिक स्थिती मजबूत तर पैसे वाचवण्याचीही शक्यता

शनिच्या लाडक्या मकर राशीसाठी २०२३ कसे जाणार? कधी होऊ शकतो प्रचंड धनलाभ तर कधी घ्यावी काळजी, पाहा
मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Capricorn Yearly Horoscope 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीवर शनि ग्रहाचे राज्य आहे. शनि ग्रह हा कर्माचं फळ देणारा आणि न्याय देणारा असल्याचं म्हटलं जातं. शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो असंही म्हणतात. यासोबतच प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीनदा शनिदेवाच्या साडेसातीला सामोरं जावं लागते. १ जानेवारी २०१३ रोजी मकर राशीच्या गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहिली, तर तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्नस्थानी शनी आणि शुक्र उपस्थित आहेत.

यासोबतच तिसऱ्या स्थानी गुरु ग्रह आहे तर चौथ्या स्थानी चंद्र आणि राहूचा संयोग आहे. मंगळ पाचव्या स्थानी असून केतूचा दहाव्या स्थानी तर सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग बाराव्या स्थानी तयार होत आहे. १७ जानेवारीला या राशीतील लोकांच्या साडे सातीचा दुसरा काळ संपण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये शनिदेव तुमच्या दुसऱ्या स्थानी प्रवेश करणार आहे. ज्यामुळे तुमची मानसिक तणावापासून सुटका होण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगले राहण्याचीही शक्यता आहे. २०२३ हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने कसे असेल ते जाणून घेऊया.

मकर राशीचे करिअर व शिक्षण (Career Of Makar Zodiac In 2023) –

मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले ठरू शकते. कारण गुरु तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या राशीतील विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शिवाय त्यांना नशीबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. ते एप्रिलपर्यंत परदेशात शिक्षण घेऊ शकतात शिवाय सप्टेंबरनंतर त्यांना आणखी एक संधी मिळू शकते. दुसरीकडे, जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते, मात्र राहु विचलित होऊ शकतो. करिअरबाबत काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागणार आहे.

मकर राशीचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध (Married Life And Relationship Of Makar Zodiac In 2023) –

२०२३ मधील १७ जानेवारीनंतर नात्यात गोडवा राहण्याची आणि प्रेमसंबंध घट्ट होण्याची शक्यता आहे. तर कुटुंबातही शांततेचे वातावरण राहू शकते. अविवाहित लोक लग्न करू शकतात. कारण गुरूची पाचवी दृष्टी पडत आहे. तसंच ज्यांना संतती हवी आहे त्यांना जुलैनंतर यश मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Finance Of Makar Zodiac In 2023) –

या राशीतील लोक जुलै २०२३ नंतर मालमत्ता खरेदी करू शकतात. त्याचबरोबर फेब्रुवारी ते मे या कालावधीत वाहन खरेदीची शक्यता आहे. त्याचवेळी, आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि पैसे वाचवण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा- २०२३ सुरू होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान? लक्ष्मी-विष्णूदेव वर्षभर देणार प्रचंड पैसा कमवण्याची संधी

मकर राशीचे आरोग्य (Health Of Makar Zodiac In 2023) –

या वर्षात मकर राशीच्या लोकांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते. तर फेब्रुवारी सुरू होताच तुम्ही जुन्या आजारांपासून मुक्त होऊ शकता. पण राहू तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चौथ्या स्थानी बसला आहे, त्यामुळे किरकोळ आजारांसह घशाचे व छातीचे आजार होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 08:00 IST

संबंधित बातम्या