Shani Blessing Birth Date: अनेक लोकांना असं वाटतं की शनीदेवांची दृष्टी नेहमीच कठोर आणि त्रासदायक असते. पण हे पूर्णपणे खरं नाही. एक असा मूलांक आहे, ज्यावर शनीदेवांची शुभ कृपा असते. शनी या मूलांकाच्या लोकांना सुरुवातीला संघर्ष आणि तणाव देतात, पण काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांच्या आयुष्यात सुधारणा होऊ लागते.

आता तुम्हाला समजलं असेल की आपण कोणत्या मूलांकाबद्दल बोलत आहोत. हा मूलांक म्हणजे ८. महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो आणि शनी हे या मूलांकाचे स्वामी मानले जातात. चला जाणून घेऊया, मूलांक ८ असलेल्या लोकांचं जीवन कसं असतं.

मूलांक ८ असलेल्या लोकांचं जीवन कसं असतं?

शनीदेवांना संथ गतीने चालणारा ग्रह मानलं जातं. त्यामुळे मूलांक ८ असलेल्या लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट लवकर मिळत नाही. त्यांचं सुरुवातीचं आयुष्य अनेक संघर्ष आणि अडचणींमध्ये जातं.

शनीदेव या लोकांची कठोर परीक्षा घेतात आणि त्यानंतरच त्यांना यशाची फळं मिळतात. असं मानलं जातं की त्यांच्या आयुष्यातील ३५वं आणि ३६वं वर्ष खूप महत्त्वाचं ठरतं. या वयानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होते आणि ते हळूहळू यशाच्या शिखरावर पोहोचतात.

३५ वर्षांनंतर हे लोक ज्या कामाला हात घालतात, त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक असते. अंकशास्त्रानुसार समाजातील अनेक मोठे उद्योगपती, राजकारणी आणि न्यायाधीश यांचा मूलांकही ८ असल्याचं सांगितलं जातं. या लोकांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते कधीही हार मानत नाहीत. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी ते शांतपणे आपलं काम करत राहतात. त्यांना दिखाऊपणा आवडत नाही आणि ते साधं, सरळ जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. गरजूंना मदत करण्यासाठी हे लोक नेहमी तयार असतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)